(रत्नागिरी)
येथील मिरजोळे एमआयडीसी येथील वेरॉन कंपनीतील लाखोंचे साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरी ६ ते ८ जानेवारी दरम्यान घडली. चोरीला गेलल्या साहित्याची किंमत १ लाख २५ रुपये इतकी आहे.
याप्रकरणी गणेश दयानंद तरेराव (रा. सोलापूर) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. वेरॉन कंपनीच्या प्लॉट नंबर डी- ७१ येथे लोखंडी साहित्य ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी या ठिकाणी प्रवेश करून १ लाख २५ हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अधिक तपासासाठी रत्नागिरी पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत.