(मुंबई)
पुण्यातील तळेगावात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प अचानक गुजरातमध्ये हलवण्यात आल्यानं राज्यात राजकीय वादंग पेटलं आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसनं शिंदे-फडणवीस सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरलं आहे. तर सेमीकंडक्टर उत्पादक कंपनी वेदांता – फॉक्सकॉन ग्रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे एक नवा राजकीय वाद उसळला आहे. आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर वेगवेगळ्या प्रकारे निशाणे साधले आहेत.
ठाकरे – पवार सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वेदांत आणि फॉक्सकॉन कंपनीची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार याविषयीची चर्चा अनिल अग्रवाल यांच्याशी झाल्यानंतर ते उठताना हसत असताना म्हणाले होते, गुंतवणुकी संदर्भात केंद्र सरकारची परवानगी घेतली पाहिजे. तेव्हाच माझ्या मनात शंका उत्पन्न झाली होती, असे देसाई म्हणाले होते. हा प्रकल्प तब्बल 1 लाख 54 हजार कोटी रुपयांचा असून यामुळे राज्यात एक लाखांपेक्षा जास्त जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाल्याचा आरोप सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
तर सुभाष देसाईंचे 7 जानेवारी 2020 चे वक्तव्य, जे टाइम्स ऑफ इंडियाच्या वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाले होते, त्याचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होऊ शकत नाहीत, असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतःच सांगितले असल्याचे भाजप आमदार नितेश राणे यांनी त्या बातमीचा हवाला देऊन सांगितले आहे. ज्यामध्ये सुभाष देसाई यांनीच हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारणे शक्य नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे “महाराष्ट्रापुढे आधी कबुली आणि मग भूलथापा…ही आहे ‘फसवी’ आदित्य सेना…ये पब्लिक है सब जानती है…” अशा शब्दांत राणेंनी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाईंवर निशाणा साधला आहे.
Welcome... https://ratnagiri24news.com 'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा. - टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
© 2021 Ratnagiri 24
© 2021 Ratnagiri 24
Alert ! You cannot copy content of this page
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !