[ नवी मुंबई ]
राष्ट्रीयकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर पदकांची लयलूट करीत असून सोमवारी रात्री वेटलिफ्टर हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्य पदकाची कमाई केली. हरजिंदर कौर ही मूळची पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील नाभा येथील रहिवासी आहे. तेव्हा पंजाबच्या भूमीतील एका खेळाडूने कांस्य पदक प्राप्त करून भारताची मान उंचावल्यामुळे हरजिंदर हिला पंजाब सरकारने मंगळवारी तिला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोमवारी भारताच्या खात्यात ज्युदोच्या दोन पदकांची भर पडली. २७ वर्षीय सुशीलादेवी लिकबामामने ४८ किलो वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली. भारतीय बॅडमिंटनपटूंनीही अंतिम फेरीत प्रवेश करत एक पदक निश्चित केले आहे. तर वेटलिफ्टर हरजिंदर कौरने देखील कांस्य पदकांची कमाई केल्यामुळे भारताच्या खात्यातील एकूण पदक संख्या ही ९ इतकी झाली आहे.