(मुंबई)
महावितरणने वीज आयोगाकडे सादर केलेल्या ६७ हजार कोटी रूपयांच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात ग्राहकांमध्ये संताप आहे. त्यांनी दरवाढी विरोधात तब्बल ३२४६ सुचना व हरकती वीज आयोगाकडे दाखल केल्या आहेत. तसेच अनेक ग्राहकांनी आणि संघटनांनी ईमेलद्वारे हरकती पाठवल्या आहेत.
वीज दरवाढीच्या प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत ग्राहकांकडून सुचना व हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार ग्राहकांनी घरघोस हरकती पाठवल्या होत्या. २०२० मध्ये सर्वाधिक २३०० हरकती वीज आयोगाकडे आल्या होत्या. ग्राहकांकडून आलेल्या हरकतींची आयोगाकडून छाननी केली जाणार आहे. त्यानंतर खुली जनसुनावणी होणार असून त्यामध्ये ग्राहकांनी प्रत्यक्ष आपली बाजू मांडता येणार आहे.