(राजापूर)
तालुक्यातील शीळ येथील विषारी द्रव प्राशन केलेल्या विवाहितेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी मृत्यू झाला, साक्षी संकेत बाईत (३२, रा. बाईतवाडी शीळ, राजापूर) असे या विवाहितेचे नाव आहे.
१ ऑक्टोबर रोजी ती तापाने आजारी असल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला डॉक्टरकडे जाऊन औषधोपचार करण्यास सांगितले होते. या कारणातून तिने रात्री १०:४५ वाजता विषारी द्रव प्राशन केला. काही वेळाने तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या नातेवाइकांनी तिला प्रथम राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथून अधिक उपचारांसाठी मध्यरात्री तिला रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असताना मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी साक्षीची प्राणज्योत मालवली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.