( रत्नागिरी )
हिंदू धर्मियांना अखिल भारतीय पातळीवर संगठित करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशभर हितचिंतक अभियान राबवले जात आहे. दिनांक ६ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानास रत्नागिरीमध्ये उदंड लोकप्रतिसाद मिळत आहे. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे ब्रीद जोपासलेल्या या संघटनेचे रत्नागिरीमध्ये अनेक हितचिंतक आहेत. यामध्ये वाढ होताना दिसत आहे.
रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या हितचिंतक अभियानाचा आढावा घेण्यासाठी विहिंपचे क्षेत्र सेवाकार्यप्रमुख श्री. भार्गव सरपोतदार यांनी बुधवार दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरीतील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. रत्नागिरी शहरातील सर्व वस्त्या आणि भागांमध्ये हितचिंतक अभियान कशाप्रकारे राबविले जात आहे, याची त्यांनी माहिती घेतली. सर्व कार्यकर्ते अभियानानिमित्त उत्साहाने लोकांशी संपर्क करत आहेत याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
हे अभियान समरसता आयाम प्रमुख श्री. भरत इदाते (९७६४२३०३४३) आणि श्री. विराज चव्हाण बजरंग दल (९५७९११५५९४) यांच्या माध्यामातून राबविले जात आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांनी आणि हितचिंतकांनी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद, रत्नागिरीमार्फत करण्यात येत आहे.