(संगमेश्वर/दिनेश आंब्रे)
विश्व समता कला मंच लोवले ता. संगमेश्वर या संस्थेच्यावतीने रत्नागिरी साळवी स्टॉप येथील माधव सभागृह येथे गुणवंतांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर मान्यवर म्हणून रत्नागिरी येथील प्रसिद्ध वकील वकील अमित शिरगावकर, सामाजिक कार्यकर्ते निशिकांत जाधव, मराठा योद्धा छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार वहाब भाई दळवी, सामाजिक कार्यकर्ते संदीप नारकर, पत्रकार असलम खान, शब्बीर मजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुलाब पुष्प देऊन दिनेश आंब्रे यांनी स्वागत केले.
गुणवंत विद्यार्थिनी कुमारी अश्विनी शरद शिंदे (मुंबई विद्यापीठ MA,68%), कुमारी प्रणोती कमलाकर जोशी (नवनिर्माण कॉलेज 60%) इयत्ता बारावी उत्तीर्ण या सुयश प्राप्त विद्यार्थिनीना प्रमुख अतिथी वकील अमित शिरगावकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. तसेच प्रमुख अतिथी ऍड.अमित शिरगावकर यांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्प देऊन यथोचित सन्मान मान्यवर निशिकांत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी पत्रकार वहाबभाई दळवी, शब्बीर मजगावकर, निकिता ताई जाधव (सामाजिक कार्यकर्त्या) श्री. निशिकांत जाधव यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथी शिरगावकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. ऍड. शिरगावकर तसेच निशिकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्तींना भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
‘बलसागर भारत होवो’
‘विश्वात शोभूनी राहो’
या दिनेश अंब्रे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमास सोनेरी किनार जडली.
विश्व समता कला मंचाचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी रत्नागिरी चे नागरिक पांडुरंग मोरे व बंधू भगीनी उपस्थित होते. मंचाचे मार्गदर्शक दिनेश अंब्रे यांनी आभार व्यक्त केले.