श्री. गजानन कमलाकर तथा आबा पाटील,
संचालक – रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, रत्नागिरी.
जिंदगी जिना आसान नही होता,
बिना संघर्ष कोई महान नाही होता!
जब तक हातोडी की मार ना पडे,
तब तक कॊई पत्थर भी भगवान नही होता!
आज २६ डिसेंबर, तसे पाहता या दिवसाचे रत्नागिरीवासीयांच्या आयुष्यात खूप महत्व आहे. वरवर पाहता दिवस येतात व जातात; पण काही दिवसाची आपण, आपले सर्वजण, आपल्याशी संबंधित सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत असतो. असा दिवस म्हणजे २६ डिसेंबर. कारण या दिवशी रत्नागिरी तालुक्यालाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या अनुभवी कार्यकाळात कामाची झेप व चुणूक दाखविली असे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे विश्वस्त, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य, महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा रत्नागिरी – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा विक्रमी मताधिकक्याने विजयी झालेले लोकप्रिय आमदार श्री. उदयजी सामंत साहेब यांचा वाढदिवस असतो. त्यामुळेच सर्वानाच या दिवसाची उत्सुकता असते. म्हणून आजच्या ता शुभ दिवशी आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
सन १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडत माननीय शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यभर पसरला. अनेक तरुण नेत्यांना त्यावेळी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी मिळाली. रत्नागिरी जिल्ह्यात ही संधी विद्यमान आमदार उदयजी सामंत यांनी साधली आणि आपल्यातील सळसळत्या रक्ताला रत्नागिरी तालुक्यातील सर्वसामान्यांचा आवाज बनवत विविध खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणाईचा श्वास बनले आहेत. त्यावेळी त्यांनी मोजक्याच लोकांना घेऊन सुरू केलेला हा प्रवास आज असंख्य लोकांच्या मनात जाऊन पोहचला. तेंव्हापासून त्यांनी पाठीमागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध करत आपल्यातील नेतृत्वाला कर्तृत्वाच्या जोरावर नवी किनार दिली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आणि आता शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली त्यांनी आपल्या मागे हुकमी मतदारांची फळी उभी केली. विविध उपक्रम घेतले. यामध्ये त्यांना त्यांचे वडील आणि सर्वांचे पितृतुल्य आदरणीय रविंद्र तथा अण्णा सामंत, मातोश्री सौ. स्वरूपाताई सामंत व यशस्वी उद्योजक माननीय किरणजी तथा भैय्याशेठ सामंत यांनी या उद्याच्या राज्य नेतृत्वाला भरारी घेण्याचे खूप मोठे बळ दिले. हे सर्व करत असताना.
विविध पदांच्या माध्यमातून वेगवेगळे लोकोपयोगी उपक्रम राबवत त्यांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत तरुणांच्या गळ्यातील ताईत बनतानाच त्यांची साथ मिळवायला सुरुवात केली. आणि आजही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणजे कारभार पाहताना त्या त्या क्षेत्रातील तरुणांना नवी दिशा देण्याचे कार्य केले. त्याचाच परिणाम अगदी तरुण वयात २००४ मध्ये त्यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आमदारकी मिळाली आणि महत्वाचे म्हणजे त्यांनीही आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ती आजपर्यंत टिकवली. रस्ते, पाणी, वीज, उद्योग, मासेमारी, इत्यादी क्षेत्रात अनेक गोष्टी त्यांनी आपल्या कल्पकतेने राबवत लोकांचे प्रश्न सोडविले.
लोकसंग्रह करतानाच आपल्या विचारांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, आरोग्य, क्रीडा, साहित्यिक, नाटय यासारखे विविध क्षेत्रातही आपल्या लोकोपयोगी हिताच्या कामाचा ठसा उमटवला. त्याठिकाणी नवनवे बदल घडवून आणले. परिणामी या क्षेत्रातील मान्यवरांना आपलेसे करत आपली एक नवी वैचारिक बैठक निर्माण केली. एक हिंदीत शायरी आहे ..
मै अकेला चला था, जानिबे मगर,
लोक आते गये और कारवा बनता चला गया!
आजच्या घडीला आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या संवाद चातुर्यामुळे प्रत्येकाला वाटते की साहेब आपलेच आहेत व आपल्यासाठीच आहेत. विशेष म्हणजे हे प्रत्येकाचे वाटणे साहेब नियमित जपत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात असणारी गर्दी ही बरेच काही सांगून जाते.
२००४, २००९, २०१४ आणि २०१९ ह्या चारही विधानसभा निवडणुकीत त्यांनी दणक्यात विजय मिळविताना आपल्या लोकप्रियतेची कसोटी सिद्ध केली. त्यामुळेच त्यांच्यातील या लोकप्रिय गुणांचा आधार घेत त्यांना तत्कालीन मंत्रिमंडळात स्थान मिळाले. तेही अगदी नऊ खात्याचे मंत्री म्हणून. अगदी कमी वयात ही जबाबदारी त्यांनी स्वीकारतानाच या सर्व खात्याला एक प्रकारची शिस्त आणली व जे काम त्यांच्याकडून अपेक्षित होते ते काम त्यांनी करून दाखविले. या सर्व खात्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. महत्वाचे म्हणजे विद्यमान आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यांच्याकडे तरुणाईचे भवितव्य ठरविणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री झाले. या विभागाचा कार्यभार घेतल्यानंतर कोविड – १९ काळात परीक्षा, अभ्यासक्रम, प्रवेशप्रक्रिया यासह अनेक गोष्टींवर काम करताना त्यांनी तरुणांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासह संस्कृत विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्रास चरित्रकार तथा ज्येष्ठ साहित्यिक धनंजय कीर हे नाव देणे, लोकमान्य टिळक यांच्या स्मारकास निधीची तरतूद करणे, रत्नागिरी जिल्हा परिषद – रत्नागिरी पंचायत समिती- रत्नागिरी नगरपरिषद यांच्या नवीन आणि भव्य इमारतीची उभारणी, तब्बल पन्नास विविध विभागाचे कार्यालये रत्नागिरी मध्ये आणणे, सागरी विद्यापीठ निर्माण करणे यासह अनेक निर्णय आदरणीय साहेबांनी याकाळात घेतले. त्यामुळेच महाराष्ट्र राज्यातील अग्रेसर मंत्री म्हणून साहेबांचा उल्लेख होतो, हे पाहून त्यांचा सहकारी असल्याचा खुप अभिमान वाटतो.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील काही महाविद्यालयात युवकांच्या प्रवेशाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी या प्रश्नांची दखल तात्काळ घेत त्यावर प्रशासनाशी संपर्क साधून त्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ पावले उचलत हजारो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. कोविड – १९ काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देत ऑनलाइन परीक्षा राबविण्यावर भर दिला.
आज शिवसेनेने त्यांच्यातील संघटन कौशल्य ओळखत त्यांना उपनेतेपद दिले आणि साहेबांनीही या उपनेतेपदाचा वापर करत रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण आणि महाराष्ट्रात संघटना वाढीस खूप मोठे योगदान दिले. त्याची चुणूक कोकणाला लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील विविध उमेदवारांच्या विजयात दिसून आली.
एखाद्याच्या कर्तृत्वाची उंची मोजायची असेल तर त्यांच्या वर्तनातून ती दिसून येते. साहेबांचे वडील आदरणीय अण्णा सामंत व साहेबांच्या मातोश्री सौ. स्वरूपाताई सामंत यांच्या संस्काराचे बीजारोपणच त्यांच्यातील मोठेपणात दिसून येते. अत्यंत नम्र स्वभाव, हजरजबाबीपणा, अलौकिक वक्तृत्व त्यामुळे आजही आदरणीय साहेबावर विरोधक अनेक प्रकारचे त्यांचे खच्चीकरण व्हावे यासाठी हल्ले करतात; पण आदरणीय साहेबांच्या मनावर संस्कारच एवढे मजबूत की, साहेब कधी त्यामुळे हलले आहेत, खचले आहेत, डगमगले आहेत कधी असे जाणवले नाही. एखाद्या आक्रमणाने साहेब संपले असे कधीच जाणवत नाही. त्यामुळे की काय अनेक जण अगदीं विरोधकासह साहेबांचे खाजगीत कौतुक करतात.
म्हणूनच आजच्या वाढदिवसाचे वर्णन करायचे असेल तर,
आज वाढदिवस सातत्याने नाविन्याचा ध्यास घेत, विविध उपक्रमांच्या माध्यमातून विकासकामांचा मोठा प्रवाह सर्वसामान्यापर्यंत पोहचवणाऱ्या एका ध्येयवेड्या विकासरत्नांचा.
आज वाढदिवस सर्वसामान्यांसाठी जीव ओतून, त्यांच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधःकार दूर करून समतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या हाडाच्या समाजकारणी आदरणीय उदयजी सामंत साहेबांचा….!!
आज वाढदिवस आपल्या शिवसैनिकांवर, कार्यकर्त्यांवर येणार प्रत्येक वार, प्रत्येक संकट, प्रत्येक समस्या हसत हसत स्वतःच्या छातीवर झेलणाऱ्या निधड्या छातीच्या दिलदार मित्र असणाऱ्या उदयजी सामंत साहेबांचा….!!
आज वाढदिवस प्रेम, आभाळमाया, ममता यांनी भरलेल्या मातृहृदयी, कोमलमनाच्या, कलासक्त, निसर्गवेड्या, साहित्यावर अगाध प्रेम करणाऱ्या कवीपणाची जाण असणाऱ्या उदयजी सामंत साहेबांचा….!!
आज वाढदिवस अनेक धाडसी निर्णय घेऊन कोकणाला, रत्नागिरी जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक लोकप्रिय स्थळांना नावलौकिक मिळवून देणाऱ्या नियोजनतज्ञ असलेल्या आदरणीय सामंत साहेबांचा.
आज वाढदिवस आहे शासन, प्रशासन, नोकरशाही, समाज आणि सर्वांनाच प्रिय असणाऱ्या आणि सर्वसामान्याच्या अडचणीत नेहमी धावून येणाऱ्या एक जिगरबाज नेता असणाऱ्या उदयजी सामंत साहेबांचा….!!
आज वाढदिवस एका अशा वक्त्याचा कि, जो उभा राहिला कि साक्षात सरस्वती ज्याच्या जिभेवर स्वार होते आणि शेकडोंच्या सभा संमोहित होतात, अशा लाजवाब वक्ता असणाऱ्या उदयजी सामंत साहेबांचा…!!
आज वाढदिवस प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याची छाप सोडतानाच, सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविताना राजकारण न करता समस्येला प्राधान्य देणाऱ्या महनीय व्यक्तिमत्वाचा.
म्हणूनच आजचा वाढदिवस सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहे. आजच्या दिवशी सगळीकडेच साहेबांच्या वाढदिवसाचे अप्रुप असते. परंतु हे सगळे काही सहजासहजी झाले नाही. त्यासाठी साहेबांनी अथक परिश्रम, चिकाटी यांच्या जोरावर सर्व रत्नागिरी तालुका, तालुक्यातील गाव न गावं; व वाडी न वाडी पिंजून काढली. परिणामी आज अशी परिस्थिती अशी आहे की, रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, साहित्यिक वा आध्यत्मिक कार्यक्रमात सामंत साहेबांची उपस्थिती ही नित्याची बाब झालीच; त्यापेक्षा सामंत साहेबांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे यासाठी लोकांचा असणारा आग्रहच साहेबांची लोकप्रियता व त्यांचे जनमानसातील स्थान सांगून जातो. त्याला कारणही तसेच आहे. समाजकारण करताना माझ्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कामाचा योग्य सन्मान झाला पाहिजे हा आदरणीय सामंत साहेबांचा अट्टाहास आजच्या स्वार्थीपणाच्या राजकारणातही मनाचा ठाव घेतो. परिणामी सामंत साहेबांचे प्रत्येकाच्या मनातील स्थान अढळ बनत जाते.
त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येते की, त्यांनी आजपर्यंत कधीही कार्यकर्ता वाऱ्यावर सोडला नाही. म्हणूनच आज त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो की,
विश्वासाची आस तुम्ही,
जगण्यातील श्वास तुम्ही,
आंनदातील आनंदाश्रू तुम्ही,
आदर्शवत आपुलकीचा दीप तुम्ही.
ही आदर्शवत आपुलकीच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते. आणि अजूनही वरचेवर घेऊन जाणार.
असे म्हणतात की, ज्यांच्या जगण्यामुळे अनेकांना जगायला मिळते, अनेकांच्या जीवनात ज्यांच्यामुळे परिवर्तन घडते, अनेकांना आधार मिळतो तेच खरे आयुष्य जगत असतात. ही उक्ती साहेबांच्या आचारशील वर्तुणुकीला साजेशी ठरते. कोणताही भेदभाव न करता आपल्या सहवासात असलेल्यानाच नव्हे तर सर्वांनाच जगण्याची उमेद देत असतात. धर्म, जात, पंथ, समाज न बघता आपण काम करताना अनेक माणसे जोडली. नुसतीच जोडली नाहीत तर त्यांना काम करण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच सामंत साहेब हे जगावेगळे ठरतात.
म्हणूनच सामंत साहेब,
प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफिलींचे गीत व्हावे,
सुर तुमच्या मैफिलींचे दूर दूर जावे…
तुमच्या पुढे ठेंगणे व्हावे, त्या उंच अंबराने,
साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखरांने.
समाजकारण असो व राजकारण दोन्ही ठिकाणी सामंत साहेबांनी आपले वेगळेपण जपले. यासोबतच साहेब रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या, जयहिंद प्रतिष्ठानच्या, बहर महोत्सवाच्या, डॉ. घाणेकर राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा,माध्यमातून अनेक समाजपयोगी कार्यक्रम करत परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतात. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, आरोग्य केंद्रे इत्यादी ठिकाणी सामंत साहेबांनी विविध संघटनाच्या माध्यमातून राबविलेले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, वैज्ञानिक, पर्यावरण विषयक, समाजप्रबोधक इत्यादी उपक्रम काळाच्या ओघात कायम चिरकाल टिकतात व पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरतात. म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला एक चारोळी दिली जी आदरणीय सामंत साहेबांच्या कार्याला, संघर्षाला पूरक आहे.
म्हणूनच साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणावेसे वाटते की,
तारुण्य तुमच्या हृदयाचे हे असेच बहरत राहो,
वार्धक्य तुमच्या जगण्याला हे असेच विसरत राहो,
आता न तुमचे कुठल्याही जखमेशी देने घेणे,
पाऊस तुमच्यावर साऱ्या सौख्याचा बरसत राहो.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे सन १९९९ च्या पूर्वीपासून मला साहेबांचा सहवास लाभला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असो वा शिवसेना पक्षातील प्रत्येक टप्प्यावर साहेबांचा सहवास कायम प्रेरणादायी ठरत आहे. रत्नागिरी तालुका युवक अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ प्रमुख, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,, रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवसेनेचे जिल्हा सहकार सेनेचे जिल्हा प्रमुख, शिवसेना तालुका संघटक, पंचायत समिती सदस्य, रत्नागिरी जिल्हा सहकारी बँक यासह अनेक क्षेत्रात माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी फक्त आदरणीय साहेबांमुळेच मिळाली. प्रत्येक वेळी आदरणीय अण्णा, माननीय भैय्याशेठ आणि माननीय साहेबांनी जो विश्वास दर्शवला, तो विश्वास टिकविण्यासाठी कायम प्रामाणिक प्रयत्न करत असताना माननीय सामंत साहेबांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते. याच मार्गदर्शनाच्या जोरावर आदरणीय साहेब देत असलेली प्रत्येक जबाबदारी स्वीकारून काम करत असतो. त्यांच्या सहवासाचा परिणाम हा कायम लाभत असल्याने अनेक अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यक दिशा मिळत असते. म्हणून साहेबांच्या बाबतीत घडणारी प्रत्येक बाब त्यांचा सहकारी म्हणून अत्यंत आनंददायी असते. त्यांची प्रशासनावर असणारी पकड, विविध समस्या हाताळण्याची पद्धत, अधिकारी – पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचे कौशल्य या सर्व बाबी त्यांच्या जवळ असल्याने पाहायला मिळाल्याने अनेक क्षेत्रात विविध बाबीवर काम करण्याचे भाग्य लाभले.
म्हणून साहेब आपणांस पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. खूप मोठे आहात. अजून खूप मोठे व्हा. जगाला हेवा वाटेल एवढी प्रगती करा.
धन्यवाद.