(मेलबर्न)
रविवारी मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनल सामना झाला. या सामन्यात इंग्लंड संघाने टी – 20 विश्व चषक जिंकून दुसऱ्यांदा चॅम्पियन्स पदाचे दावेदार ठरले आहेत. या विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाला 13 कोटी रुपये मिळाले आहेत. तर उप विजेत्या ठरलेल्या पाकिस्तान संघाला 6.5 कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंड संघालाही बक्षीस मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघालाही रक्कम मिळणार आहे. रोहित शर्मा आणि केन विल्यमसन यांच्या संघाला प्रत्येकी 3.29 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.
सुपर 12 मधून बाहेर पडलेल्या आठ संघाला प्रत्येकी 70,000 डॉलर म्हणजे 57.65 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच सुपर 12 स्टेजमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40,000 डॉलर म्हणजे 32.95 लाख रुपये मिळणार आहेत. सुपर 12 स्टेजमध्ये 30 सामने झाले आहेत. त्याशिवाय पहिल्या राऊंडमध्ये प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला 40,000 डॉलर म्हणजे 32.95 लाख रुपये मिळणार आहेत.