(चेन्नई)
विश्वचषक २०२३ मधील पाकिस्तान-अफगाणिस्तान सामन्याचा रोमांचक वळणावर शेवट झाला असून अफगाणिस्तान संघाने २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला ४९ षटकांत २ बाद २८४ धावा ठोकत सहज विजय मिळविला. दरम्यान पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव होता. तर अफगाणिस्तानकडून पहिला.
अफगाणिस्तानने विश्वचषकाच्या22व्या सामन्यात पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. या विश्वचषकातील हा तिसरा मोठा उलटफेर आहे. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता तर दक्षिण आफ्रिकेला नेदरलँडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना सात गडी गमावून 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 49 षटकांत दोन गडी गमावून 286 धावा केल्या आणि सामना आठ विकेट्स राखून जिंकला.
अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने सर्वाधिक 87 धावा, रहमत शाहने नाबाद 77 आणि रहमानउल्ला गुरबाजने 65 धावा केल्या. कर्णधार शाहिदीने नाबाद 48 धावा केल्या. 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. गुरबाज आणि इब्राहिम यांनी पॉवरप्लेमध्येच 60 धावा जोडल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. गुरबाज 65 धावा करून बाद झाला. यानंतर इब्राहिमने रहमत शाहच्या साथीने 60 धावांची भर घातली. इब्राहिम 87 धावांवर बाद झाला, पण यानंतर अफगाणिस्तानने एकही विकेट गमावली नाही.
शाहिदी आणि रहमत शाह यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 96 धावांची भागीदारी करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून हसन अली आणि शाहीन शाह अफरीदी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. विश्वचषकात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघाने दोन सामने जिंकले आहेत. त्याचवेळी, एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला पहिल्यांदाच अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता पाकिस्तानचा संघ सलग तीन सामने हरला आहे.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघानं निर्धारित 50 षटकांत सात विकेट गमावत 282 धावा केल्या असून अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि अब्दुल्ला शफीक यांनी अर्धशतके झळकावली. बाबरने 92 चेंडूत 4 चौकार अन् 1 षटकारासह सर्वाधिक 74 धावा केल्या तर अब्दुल्ला शफीकने 75 चेंडूत 4 चौकार अन् 2 षटकारासह 58 धावांची खेळी केली. २५ षटकांपर्यंत अफगाणने अचूक गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केले. बाबरला या सामन्यात सूर सापडला. ४२ व्या षटकांत बाबर बाद झाला. तेव्हा पाकची ५ बाद २०६ अशी स्थिती होती. बाबरने ९२ चेंडूत ७४ धावा काढताना फक्त ४ चौकार आणि १ षटकार मारला. नूरनेच त्याला बाद केले.
अखेरच्या षटकांमध्ये शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनी शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या 282 पर्यंत नेली. दोघांनी 40-40 धावांचे योगदान दिले. सौद शकीलने 25 आणि इमाम उल हकने 17 धावा केल्या. मोहम्मद रिझवानला केवळ आठ धावा करता आल्या. शाहीन आफ्रिदी तीन धावा करून नाबाद राहिला.
अफगाणिस्तानकडून नूर अहमदने 10 षटकात 49 धावा देताना सर्वाधिक तीन आणि नवीन उल हकने 7 षटकात 52 धावा देत दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
𝑶𝒏𝒆 𝒇𝒐𝒓 𝒕𝒉𝒆 𝑹𝒆𝒄𝒐𝒓𝒅 𝑩𝒐𝒐𝒌𝒔! 📝
This is Afghanistan's highest successful run-chase in ODIs. 🤩
Congratulations to everyone out there! 🎊#AfghanAtalan | #CWC23 | #AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/n3RphSMKSl
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 23, 2023