(नवी दिल्ली)
संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनासाठी संयुक्त रणनीतीवर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी मंगळवारी बैठक बोलाविली आहे. ही बैठक कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकित संयुक्त रणनीती ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
कॉंग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल म्हणाले, मोदी सरकारने दि. 18 ते 22 सप्टेंबर रोजी विशेष अधिवेशन बोलविले आहे. या आगामी अधिवेशनाच्या अजेंड्यावर बैठकीत चर्चा केली जाईल. यासंदर्भात कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी खर्गे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन संघटनात्मक समस्या आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.