(संगमेश्वर / प्रतिनिधी)
बहुजनांचे कैवारी, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, पत्रकारिता क्षेत्रात आपला प्रभावी ठसा उमटविणारे दिवंगत विलास होडे यांचा १५ वा स्मृतीदिन दि. १ जुलैला सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत देवरूखच्या कुणबी भवनात आयोजित करण्यात आला आहे.
माजी राज्यमंत्री श्री. रवींद्र माने, आ. शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, राजन देसाई, प्रकाश कांबळे, बाळासाहेब पाटणकर, सुरेश नायजे, अभिजित हेगशेट्ये, संजीव अणेराव, चंद्रकांत परवडी, राजन इंदुलकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहाणार आहेत.
विलास होडे यांचे विविध क्षेत्रातील काम जनतेसमोर यावे, त्यांच्या माहितीचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी २०० पानी रंगीत गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. विलास होडे यांच्या विचाराने, उद्देशाने काम करणाऱ्या कार्यकत्यांना त्यांच्या नावाचा पुरस्कार देण्यात येणार आहे. कुणबी समाजातील उच्च शिक्षण घेणान्या मुलींना विलास होडे यांच्या नावाने शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
कुणबी भवनातील स्मृतीदिन कार्यक्रमाला दिवंगत विलास होडे. यांना अभिवादन करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गौरव ग्रंथ समितीचे अध्यक्ष श्री. युयुत्सु आर्ते, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, सुरेश पातेरे आदींनी केले आहे.