( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
देवरूख येथील युवा चित्रकार आणि रांगोळीकार विलास रहाटे यांनी काढलेल्या रांगोळीला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रशंसा मिळाली आहे. मुंबई विद्यापिठात नुकत्याच एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शंकर भारती या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यापिठाने लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इनामदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आदर्श आणि राजकीय गुरू आहेत. या व्याख्यानाला स्वत: अमित शाह उपस्थित होते.