(मुंबई)
राज्यात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढच होताना दिसत आहे. मुंबई विरार येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच 3 मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी तिच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक केली आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.
पीडित मुलगी मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता मोबाईल दुरुस्त करण्यासाठी घराबाहेर निघाली होती. यावेळी तिची मैत्रीण तिला भेटली. आपण फिरायला जाऊ असे सांगून मैत्रिणीने एका निर्जन ठिकाणी नेले. या ठिकाणी अगोदर उपस्थितअसलेल्या तिच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. घटना घडली त्यावेळी तिची मैत्रीण घटनास्थळी हजर होती. रात्री दीडच्या सुमारात ही घटना घडली. आरोपींनी मुलीला पहाटे 5 वाजता घरी सोडले.
संबंधित प्रकार पीडित मुलीच्या आईला समजताच बुधवारी संध्याकाळी विरार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली. याप्रकरणी विरार पोलिसांनी पीडित मुलीची मैत्रीण तसेच लाला, शुभम सिंग, आणि प्रतीक सिंग या चौघांवर पोक्सो तसेच बलात्कार आणि अनैसर्गिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विरार पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार करून 6 तासंच्या आत पीडित मुलीच्या मैत्रिणीसह दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी पकडलेले सर्व आरोपी सज्ञान असून वीस ते बावीस वर्ष वयोगटातील आहे.