( मुंबई )
VT-DBL हे Learjet 45 विमान विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत असताना मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले आणि त्याचा अपघात घडला. ही घटना मुंबई विमानतळावर14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5.04 वाजता घडली. हे एक खासगी विमान होते. घटना घडली तेव्हा विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर विमानतळावरील सर्व कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले.
हे एक खासगी विमान होते. घटना घडली तेव्हा विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स होते. घटनेनंतर विमानतळावरील सर्व कामकाज तात्पुरते बंद ठेवण्यात आले. सुरक्षेचा सर्व आढावा घेतल्यानंतर कामकाज पूर्ववत करण्यात आले. या घटनेचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#mumbaiplaneaccident A private jet having 6 pax and two crew members on board met an accident while landing at #MumbaiAirport pic.twitter.com/a4Llt2g1ps
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) September 14, 2023
विशाखपट्टणमहून हे विमान मुंबईत आलं होतं. गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धावपट्टी क्रमांक २७ वर उतरत असताना हे विमान घसरले. अपघातग्रस्त विमानाचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. विमानात ६ प्रवासी आणि २ क्रू मेंबर होते. त्यातील तिघे अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त विमान (VSR Ventures Learjet 45 Aircraft VT-DBL) हे दिलीप बिल्डकॉन या इन्फ्रा कंपनीच्या मालकीचं आहे. नागरी उड्डाण महासंचालकांनी एक निवेदनाद्वारे अपघाताची सविस्तर माहिती दिली आहे.
VSR Ventures Learjet 45 aircraft VT-DBL operating flight from Visakhapatnam to Mumbai was involved in runway excursion (veer off) while landing on runway 27 at Mumbai airport. There were 6 passengers and 2 crew members on board. Visibility was 700m with heavy rain. No casualties…
— ANI (@ANI) September 14, 2023
अपघातानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं असून विमानतळ तूर्त वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. संपूर्ण स्थितीची पाहणी केली जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.