( प्रतिनिधी / रत्नागिरी )
जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग ओरस येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेमध्ये मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पाली च्या 17 वर्षाखालील संघाने थर्ड प्लेस प्राप्त केली आहे. या संघाचे स्पर्धेतील मोठे यश आहे.
विभागीय थ्रो- बॉल स्पर्धेमधील थर्ड प्लेस साठी सातारा विरुद्ध रत्नागिरी या झालेल्या सामन्यांमध्ये प्रशालेने साताऱ्याचा 2-0 असा पराभव करून थर्ड प्लेस प्राप्त केले आहे.
या स्पर्धेमध्ये सांगली महानगरपालिका, कोल्हापूर ग्रामीण, कोल्हापूर महानगरपालिका, सातारा, सांगली ग्रामीण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इचलकरंजी महानगरपालिका हे आठ संघ सहभागी झाले होते.साखळी सामन्यांमध्ये प्रथम प्रशालेने कोल्हापूर ग्रामीण संघाचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
पाली प्रशालेकडून आदित्य सुवारे, राज रसाळ, राणाभुवन पालकर, वेदांग पांचाळ, सुयश नागले, निखीलेश सावंतदेसाई,कार्तिक पोवार, पारस पालकर, यश लिंगायत, सार्थक गोरे, सुजल नागले हे विद्यार्थी विजयी संघात होते.
या सर्व खेळाडूंना मराठा मंदिर न्यू इंग्लिश स्कूल पालीच्या प्राचार्या प्रियदर्शनी रावराणे,
पर्यवेक्षिका नम्रता दळी यांचे सहकार्य व प्रशालेतील क्रिडा शिक्षक तुफील पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी- विभागीय शालेय थ्रो बॉल स्पर्धेतील पाली हायस्कूलच्या विजयी संघातील खेळाडू सोबत क्रिडाशिक्षक तुफील पटेल.