(रत्नागिरी / प्रतिनिधी)
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या विद्यमाने तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहनूर चिपळूण तालुका तायक्वांदो अँकॅडमीच्या सहकार्याने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा 14,17 व 19 वयोगटामध्ये क्रीडा संकुल डेरवण (सावर्डा) येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी झाली आहे.
या विभागीय स्पर्धा 16 ते 18 जानेवारी दरम्यान श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा या ठिकाणी संपन्न होणार असून या स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या 5 जिह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.