(रत्नागिरी/प्रतिनिधी )
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे 7 मे रोजी रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोक अदालत सकाळी 10.30 वा. भरवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणांकडून देण्यात आली आहे.
या लोक अदालतीमध्ये प्रलंबित किंवा वादपूर्व प्रकरणात विनाविलंब निकाल मिळतो. तोंडी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तीवाद या बाबी टाळल्या जातात. कोणत्याही पक्षकाराचा जय अथवा पराजय झाल्याची भावना रहात नाही. दोन्ही पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळते. या निवाडयामुळे वेळ व पैसा याची बचत होते आणि प्रलंबित प्रकरणामध्ये न्यायालयात निवाडा झाल्यास कोर्ट फी ची रक्कम पक्षकारांना परत केली जाते.