(रत्नागिरी)
शिक्षकांच्या विविध समस्यांबाबत अतिशय जागृतपणे काम करून त्या सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून कार्यरत असलेले श्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे, अध्यक्ष ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांना कोकण विभाग शिक्षक मतदार संघात विधानपरिषद निवडणूक उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांना महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा पाठिंबा जाहीर करत आहोत.
वरिष्ठ महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडवण्यासाठी सतत काम करणाऱ्या महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पाठिंबा देऊन प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी काम करण्यासाठी आवाहन केले आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ.विजय पवार महासचिव डॉ. निर्मला पवार यांनी पाठिंबाचे लेखी पत्र दिले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यांचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा ना. उदय सामंत यांच्या निवास्थानी पाली- रत्नागिरी येथे डॉ.आनंद आंबेकर महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे राज्य कार्यकारणी मंडळ सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा जिल्हाध्यक्ष यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत , सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण आणि अनेक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.