(पुणे)
पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोट निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. काही किरकोळ घटना वगळता दोन्ही ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कसब्यामध्ये ५०.०६ टक्के तर चिचंवड मध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले. अटीतटीने लढल्या गेलेल्या व सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदार राजाने आपला कौल मतपेटीद्वारे दिला आहे. या निवडणुकीचा निकाल गुरुवारी २ मार्च रोजी लागणार असून त्याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट , तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली. मतदानाच्या दिवशी भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पैसै वाटपकरण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या घटना वगळता कसब्यात शांततेत मतदान झाले.