(मुंबई)
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी मतमोजणी घेण्यात आली. यावेळी, मनसेचे एकमेव आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी भाजपचे राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर, सपा आणि एमआयएम यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत १६४ सदस्यांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांना मतदान केले. तर राजन साळवी यांना १०७ मते मिळाली आहेत. त्यामुळे राहुल नार्वेकर हे विजयी झाले असून त्यांची महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी जाहिर केले.