[ निवोशी-गुहागर/उदय दणदणे ]
देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ग्रामपंचायत उमराठ कार्यालयात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्याने राष्ट्रध्वज उभारून तिरंगा फडकविण्यात आला आहे. विधवा महिलांना सुद्धा सन्मानाची वागणूक मिळावी या शुद्ध हेतूने हर घर तिरंगा अभियानाच्या दुसऱ्या दिवशी विधवा स्थानिक ग्रामस्थ मतदार महिलेला मान देऊन श्रीमती जयश्री शांताराम गावणंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा फडकविण्यात आला.
यापुर्वीच ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन विधवा महिलांना मान-सन्मानाने वागता यावे यासाठी पाऊले उचललेली असून याबाबतची सुरूवात उमराठ गावातून महिलांना मान देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणे हा सुद्धा त्यातीलच एक भाग आहे. असा निर्णय घेणारी ग्रामपंचायत उमराठ ही बहुधा गुहागर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत आहे.
या प्रसंगी सरपंच जनार्दन आंबेकर, ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उपसरपंच सुरज घाडे, सदस्या साधना गावणंग, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, तंटामुक्ती समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष वसंतराव कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले, ग्रामस्थ शशिकांत गावणंग, शांताराम गोरिवले, देवजी गोरिवले, गंगाराम गोरिवले, महेश गोरिवले, विनायक कदम, श्रीकांत कदम, अशोक जालगावकर, देवेंद्र जालगावकर, अविनाश कदम, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, समृद्धी गोरिवले, आशा सेविका रूचिता कदम, बचतगट सीआरपी वैष्णवी पवार, सानिका पवार आणि बहुसंख्य ग्रामस्थ आणि महिला भगिनी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप रामाणे सर, पदवीधर शिक्षक श्री अनिल अवेरे सर, उपशिक्षिका सौ. प्रियांका कीर, सौ. सायली पालशेतकर मॅडम तसेच विद्यार्थी आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग व प्रशांत कदम अशी असंख्य मंडळी उपस्थित होती.