(रत्नागिरी)
संघटनेच्या ४५ व्या वर्धापनदिनाचे ओैचित्य साधून संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष रविंद्र बाराई व संघटनेचे केंद्रिय सरचिटणीस आर.टी. देवकांत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार सामाजिक बांधिलकी ठेवून दि.०१ आॅक्टोबर २०२२ रोजी हाॅटेल प्रसाद रत्नागिरी येथे संघटनेच्या रत्नागिरी सर्कलद्वारे व रेडक्रॉस रक्तपेढी रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमान रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या रक्तदान शिबिर सामाजिक उपक्रमाचे उदघाटन वैभव थोरात, सहाय्यक महाव्यवस्थापक, कोकण झोन रत्नागिरी यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे आप्पासाहेब पाटील, उपमुख्य ओैद्योगिक संबध अधिकारी व तेजस पाटील, व्यवस्थापक (मा.सं.) मंडळ कार्यालय रत्नागिरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे झोन अध्यक्ष किशोरराव साळुंखे व तर प्रमुख मान्यवरांमध्ये प्रादेशिक कार्यकारणी सदस्य संजयराव भोसले व झोन सचिव महेंद्र पारकर हे ही उपस्थित होते.
तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळच्या कार्यकाळात दि. ०४ सप्टेंबर १९७७ रोजी तांत्रिक कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी संस्थापक अध्यक्ष अब्दुल सलाम यांनी फार मोठया हिंमतीने विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे रोप लावले. नुसते रोप लावले नाही तर हे रोप वाढवण्यासाठी त्याला नि:स्वार्थपणाचे खतपाणी घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतानाच तांत्रिक कर्मचारीमधून नि:स्वार्थपणे काम करणारे अनेक तांत्रिक कर्मचारी मुख्य पदावर घेतले. अशांपैकिच ज्यानी तन, मन, धनाने स्वत:ला झोकून देवून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनला बळ दिले. त्यांनी महावितरण मधिल महत्वाची प्रमुख संघटना म्हणून उदयास आणली. ज्यांनी तांत्रिक कर्मचारी यांना स्वतंत्र दोन वेतनश्रेणी मिळवून दिल्या की ज्यामुळे तांत्रिक कर्मचारी खर्या अर्थाने आर्थिक सबळ झाला. तमाम महाराष्ट्रातील तांत्रिक कर्मचारी यांचे दैवत म्हणून त्यांचा सतत उल्लेख केला जातो असे महनिय व्यक्ति म्हणजेच रणजित देशमुख. देशमुख यांनी अनेक अडचणिवर मात करुन महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांमधील महत्वपुर्ण प्रमुख संघटना म्हणून नावारुपास आणली. संस्थापक अध्यक्ष अब्दुल सलाम आणि रणजित देशमुख यांचे विचार व संघटनेची उद्दिष्टे सोबत घेवून सद्यस्थितीत केंद्रिय अध्यक्ष रविदादा बाराई व केंद्रिय सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी आपल्या निस्वार्थ भावनेने संघटनेचे काम करताना महावितरण कंपनीतील प्रशासनावर वैचारिकदृष्ट्या संघटनेचा प्रभाव दाखवला. ज्यामुळे समस्त तांत्रिक कर्मचारी यांना त्याचा लाभ झाला आणि होतोय १९७७ साली लावलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रुपांतर झालंय. ४५ वर्ष अविरतपणे त्या त्या काळानुसार सर्व पदाधिकारी व सभासद हे स्वहिताचे हक्क मिळवताना आपण काम करत असलेल्या कंपनीलाही नावारुपास आणले त्यामध्ये तांत्रिक कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा व्यक्तीने आभार मानून ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त सर्व पदाधिकारी व सभासद यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
अस म्हटंल जाते की, कामगार संघटना या केवळ कामगारांच्या हितासाठी झटतात मात्र विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन याला अपवाद आहे. कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढता लढता सर्व पदाधिकारी व सभासद यांना सोबत घेवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम ही संघटना अविरतपणे करताना दिसते. कोरोना काळात संघटनेच्या सभासदांनी संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 14000 युनिट्स रक्तदान केले होते त्यामुळेच त्याची दखल तेव्हाचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांनी घेऊन संघटनेच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले होते त्यापैकिच एक सामाजिक बांधिलकी म्हणून ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त तांत्रिक कर्मचारी यांनी केलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
कार्यक्रमात उदघाटक म्हणून लाभलेले वैभव थोरात यांनी सर्व तांत्रिक संघटनेचे पदाधिकारी आणि सभासद यांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना संघटनेच्या सुरवातीच्या वाटचालीपासूनची माहीती विषद केली. त्यांचे वडिल हे तांत्रिक कर्मचारी होते. त्यामुळे तांत्रिक कामगारांना काय अडचणी असतात याची चांगलीच माहिती असल्याने त्यानुसार त्यांनी सुरक्षिततेवर आणि मिळणार्या वेतनातून बचत कशी करावी याबाबत उत्तम मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे आप्पासाहेब पाटिल साहेब यांनी आपल्या मनोगतातून कोकणामध्ये काम करणार्या सर्व लाईन स्टाफ व आॅपरेटर्स यांच्या कार्याबद्दल गाैरवोदगार काढले. विशेष करुन लाईन स्टाफचे विशेष काैतुक केले.
संपुर्ण महाराष्ट्रात जास्तित जास्त डोंगरदर्या, नद्यानाले यांच्यातून एच.टि./एल.टि. लाईनचे जाळे कुठे असेल तर कोकणात. डोंगर, दऱ्या, ऊन वारा पाऊस, वादळ, महापूर अशा प्रतिकूल परिस्थितीत इथला लाईन स्टाफ कर्मचारी कशाचीही तमा न बाळगता दिवस रात्र काम करत असतो याची जाणीव आपल्याला असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले आणि म्हणूनच थकबाकी वसुलीत कोकण विभाग नेहमीच अग्रेसर असतो याबाबत लाईनस्टाफच्या कामाबाबत गौरवोद्गार काढले. जो लाईन स्टाफ कोकणात काम करतो तो महाराष्ट्रत कुठेही सहज काम करेल. त्यामुळे कोकणातील काम किती जोखमिचे आहे याबाबत पाटिल यांनी विशेष नोंद घेतली. त्याच बरोबर पाटिल हे ही सांगायला विसरले नाहीत की, तांत्रिक कर्मचारी यांचे आर्थिक नियोजन होताना दिसत नाही. यासाठी आर्थिक सल्लागार यांना निमंत्रित करुन त्यांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम करावा जेणेकरून सेवानिवृत्त झालेल्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना आपल्याला मिळालेल्या पैशांचे योग्य आर्थिक नियोजन करता येईल.
तेजस पाटिल यांनी सर्वांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना संघटनेचे पदाधिकारी हे प्रशासनासोबत उत्तमरित्या समन्वय साधत असल्याने कार्यालयीन काम चांगल्या पध्दतीने होत असते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यपध्दती चांगली असल्याचे त्यानी आवर्जुन सांगितले. सर्व प्रमुख मान्यवरांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांना ४५ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना अशाच पध्दतीने संघटनेने पुढे वाटचाल करावी अशा सदिच्छा दिल्या. आणि ज्या ज्या रक्तदात्यांनी सामाजिक भान ठेवून रक्तदान केले त्याबद्दल मान्यवरांनी व संघटनेच्या पदाधिकारी यांनी रक्तदात्यांचे विशेष आभार मानले.
यावेळी पुढील रक्तदात्यांनी रक्तदान केले १) श्री. दिपेंद्र जाधव. २) श्री. नितिन देशमुख ३) श्री. आतिष हरेकर ४) श्री. एम.के.पंडित.५) श्री. भागोजी वरक.६) श्री. विश्वास शिंदे. ७) श्री. सुयोग कार्लेकर. ८) श्री. अभिजित तांडेल. ९) श्री. निलेश कोकरे. १०) श्री. संदिप जावळे.११) श्री. सुरज बोंबले. १२) श्री. संदिप कडवेकर. १३) श्री. गाैरव लाखण. १४) श्री प्रशांत शिंदे. १५) श्री पंकज मलुष्टे. १६) श्री राजेश महाडिक. १७) श्री किरण बारगोडे. १८) श्री. रविंद्र कोतवडेकर. १९) श्री. संजय भोसले.२०) श्री. संदिप रसाळ. २१) श्री कमलाकर गुरव. २२) श्री. महेंद्र शिवलकर. इत्यादी कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याशी योग्य समन्वय साधणारे मनमिळावू सर्कल सचिव मा. श्री. महेंद्रजी शिवलकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. सुत्रसंचालना सोबतच संघटनेच्या विविध बाबींचाही आढावा देताना केवळ तांत्रिक संघटनेने कर्मचारी यांच्या हितासाठी कुटुंब आधार योजना चालू केल्याचे सांगितले. त्याचा लाभही मयत कर्मचारी यांच्या वारसांना झालेला आहे हे निदर्शनास आणून दिले.
संपुर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी व उपस्थित सभासद यांनी विशेष मेहनत घेतली.. यामध्ये विशेष करुन झोन सचिव श्री. महेंद्र पारकर, झोन संघटक नंदकुमार कदम, सर्कल अध्यक्ष बिपिन कोल्हापुरे, सर्कल सचिव महेंद्र शिवलकर, रत्नागिरी विभागिय अध्यक्ष भागोजी वरक, रत्नागिरी विभागिय सचिव संदिप नेवरेकर, चिपळूण विभागिय अध्यक्ष मयुर पंडित, चिपळूण विभागिय सचिव निलेश खेतले, खेड विभागिय अध्यक्ष पि. एम. पवार, खेड विभागिय उपसचिव राजकुमार पवार, श्री. विनायक मांडवकर, श्री. पुरुषोत्तम लिंगायत, श्री. जयेश महाडिक, श्री. संदिप कडवईकर, श्री संदिप रसाळ आदी उपस्थित होते.