( चिपळूण )
विकास सहयोग प्रतिष्ठानने सन २०२१ मध्ये चिपळूणमधील महापुराच्या वेळी बाधित कुटुंबांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून चिपळूणमधील दोन हजार कुटुंबांची जिवनावश्यक गोष्टींची गरज लक्षात घेऊन अन्नधान्य व औषधांची मदत उपलब्ध करून दिली होती, त्याचबरोबर कोरोनाच्या काळात मुबंईमधील पश्चिम विभागातील हॉस्पिटल व पोलिस ठाणे मधील काम करणारे कर्मचारी यांना दोन हजार पीपीइ किट संस्थेतर्फे देण्यात आले. याच काळात कामगार वस्त्यांमधील गरीब कुटुंबाची गरज लक्षात घेऊन मुबंई, रत्नागिरी, बुलढाणा व अमरावती येथील पंधरा हजार कुटुंबाना किमान २५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य संस्थेतर्फे देण्यात आले होते. संस्थेच्या अशा अनेक कामाची दखल घेवून या कामाचे विशेष कौतुक म्हणून ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतीय सेवा रत्न बेस्ट एन. जी. ओ. अवार्ड या वर्षी विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेला देण्यात आला. पद्मश्री डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते विकास सहयोग प्रतिष्ठान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे यांना दि १ मे २०२२ रोजी पुणे येथील नोवेटेल हॉटेलमध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विकास सहयोग प्रतिष्ठान या संस्थेने राबविलेल्या संकल्पना विदर्भासारख्या दुष्काळी पट्ट्यामध्ये सात हजार परिसर पोषण बागा तयार करून ती आता महाराष्ट्रात सर्वत्र राबवण्यात येत आहे. या संकल्पनेतून महिलांना लघु उद्योगासाठी सहकार्य व मार्गदर्शन सुद्धा संस्था करत आहे. बुलढाणा, धुळे येथील शेतकरी यांना शेतीची अवजारे आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री व महिला बचत गटांना शेळी पालन व्यवसाय उभे करण्यास वेगवेगळ्या देणगीदार यांच्या कडून आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देण्यात आले. धारणी येथील डोमा या गावातील आरोग्य केंद्र दुरुस्त करून दिले. शेतीच्या नव नवीन संकल्पनेतून सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष केंद्रित करून त्यांचे प्रशिक्षण व मातीची तपासणी करून पाचशे शेतकऱ्यांना निसर्ग शेती करण्यास मदत केली. नाबार्डच्या मदतीने १७२ जे.एल.जी.गटाना व्यवसाय सुरू करण्यासाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले.अहमदनगर व बुलढाणा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या नुतनीकरण आणि दुरुस्तीचे काम केले आहे .संस्थेच्या या कामाची दखल घेवून या कामाचे विशेष कौतुक म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतातील जम्मू कश्मीर, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल,पंजाब, हरियाणा या राज्यामधून सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था-संघटनांचे प्रतिनिधी, प्रत्रकार व लेखक मंडळीनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता.