(चिपळूण)
केंद्र सरकारच्या विविध योजना तळागाळात पोहोचाव्यात, त्याबाबत जागृती व्हावी. यासाठी गावा-गावातून विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरवला जात आहे. केंद्र सरकारच्या या योजना असल्या तरी रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा सुरू आहे. रथ यात्रेत गावचे तलाठी, ग्रामसेवकच योजनांची माहिती देतात. ही माहिती गावात ग्रामसभा घेऊन देता येऊ शकते. त्यामुळे जतनेच्या पैशातून विशिष्ट पक्षाचाच उदो उदो केला जात असल्याचा आक्षेप ग्रामपंचायतींनी घेण्यास सुरवात केली आहे. याबाबत चिवेलीच्या सरपंचानी थेट तहसीलदारांना लेखी पत्र देत गावात रथ न फिरवण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरू लागला आहे. मात्र या रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा केला जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमांतर्गत विविध योजनांबाबत माहिती दिली जाते. रथयात्रेसोबत नोडल अधिकारी येतात. परंतू गाव स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक हे योजनांची माहिती देतात. जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनाकडून लोक जमविण्याचे आदेश असल्याने ना-ना शकला लढवून लोकांना निमंत्रित करण्याचा प्रकार सुरू आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजना असोत. त्याबाबत नियमीतपणेच गावस्तरावर त्या-त्या यंत्रणेकडून माहिती दिली जाते. रथ यात्रेतून दांडोरा पिटण्यापेक्षा ग्रामसभा आयोजित करून देखील सविस्तर चर्चा होऊ शकते, शेतकरी, ग्रामस्थ, महिला, अथवा युवकांच्या शंकाचे निरसन केले जाऊ शकते. मात्र ही रथ यात्रा आगामी निवडणुकांची चाहूल असल्याची शंका ग्रामस्थ गावोगावी घेऊ लागले आहेत.
ग्रामपंचायत चिवेली कार्यक्षेत्रात २२ डिसेंबरला भारत सरकारच्या योजनेंच्या आलेल्या रथामध्ये भारत सरकारचा उल्लेख न करता मोदी सरकार असा उल्लेख केला आहे. ही रथयात्रा गोरगरीब जनतेच्या पैशाची असून रथ वैयक्तीक नावाने फिरवला जातोय. हे चुकीच्या पद्धतीने सुरू असून शासनाने व्यक्तीच्या अथवा विशिष्ट पक्षाच्या जाहीरातबाजीसाठी जनतेच्या पैशाची लूटमार होत असल्याचे जाणवते. अशा प्रकारच्या जाहीरातीबाबत निषेध आहे असे योगेश शिर्के, सरपंच चिवेली, तालुका चिपळूण यांनी म्हटले आहे .
रथ फिरवला जात आहे. केंद्र सरकारच्या या योजना असल्या तरी रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा सुरू आहे. रथ यात्रेत गावचे तलाठी, ग्रामसेवकच योजनांची माहिती देतात. ही माहिती गावात ग्रामसभा घेऊन देता येऊ शकते. त्यामुळे जतनेच्या पैशातून विशिष्ट पक्षाचाच उदो उदो केला जात असल्याचा आक्षेप ग्रामपंचायतींनी घेण्यास सुरवात केली आहे. याबाबत चिवेलीच्या सरपंचानी थेट तहसीलदारांना लेखी पत्र देत गावात रथ न फिरवण्याची मागणी केली.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ फिरू लागला आहे. मात्र या रथ यात्रेतून मोदी सरकारचा गवगवा केला जात असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमांतर्गत विविध योजनांबाबत माहिती दिली जाते. रथयात्रेसोबत नोडल अधिकारी येतात. परंतू गाव स्तरावरील ग्रामसेवक, तलाठी कृषी सहायक हे योजनांची माहिती देतात. जिल्हा परिषद तसेच जिल्हा प्रशासनाकडून लोक जमविण्याचे आदेश असल्याने ना-ना शकला लढवून लोकांना निमंत्रित करण्याचा प्रकार सुरू आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही योजना असोत. त्याबाबत नियमीतपणेच गावस्तरावर त्या-त्या यंत्रणेकडून माहिती दिली जाते. रथ यात्रेतून दांडोरा पिटण्यापेक्षा ग्रामसभा आयोजित करून देखील सविस्तर चर्चा होऊ शकते, शेतकरी, ग्रामस्थ, महिला, अथवा युवकांच्या शंकाचे निरसन केले जाऊ शकते. मात्र ही रथ यात्रा आगामी निवडणुकांची चाहूल असल्याची शंका ग्रामस्थ घेऊ लागली आहेत.
शासनाने व्यक्तीच्या अथवा विशिष्ट पक्षाच्या जाहीरातबाजीसाठी जनतेच्या पैशाची लूटमार होत असल्याचे जाणवते. अशा प्रकारच्या जाहीरातीबाबत निषेध आहे असे योगेश शिर्के, सरपंच चिवेली, तालुका चिपळूण यांनी म्हटले आहे .