(रत्नागिरी)
वाहतुकीचे नियम मोडणार्या 1 लाख 94 हजार वाहन चालकांकडून 6 कोटी 13 लाख दंड जिल्हा वाहतूक पोलिसांनी वसुल केला आहे. वर्षभरातील या कारवाईमध्ये विना हेल्मेट फिरणार्या दुचाकीस्वारांचा अधिक समावेश आहे.
जिल्हयात जानेवारी 2021 ते मार्च 2022 या सव्वा वर्षाच्या कालावधीत जिल्हा वाहतूक शाखेने 1 लाख 94 हजार 24 वाहन चालकांवर कारवाई केली.
दंडात्मक केलेली कारवाई
हेल्मेट नसलेले दुचाकी चालक दंड – 1 कोटी 74 लाख 78 हजार
सीटबेल्ट न वापरणारे वाहन चालक – 26 लाख 75 हजार
मोबाईलवर बोलताना आढळलेले वाहन चालक – 2 लाख 24 हजार
विमा नसलेले वाहन चालक – 10 लाख 8 हजार 800 रुपये
परवाना नसताना वाहन चालवणे – 27 लाख 55 हजार रुपये
फॅन्सी नंबर प्लेट वाहन चालक – 17 लाख 27 हजार रुपये