(वास्तू)
काही लोकांना थोड्या कष्टाने लगेच देवी लक्ष्मीची साथ मिळते, तर काही लोक खूप मेहनत करूनही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकत नाहीत. ज्योतिष शास्त्रानुसार घरातील अनेक गोष्टींमुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार, घरात कोणत्या वस्तू ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन पैशाती कमतरता भासत नाही.
1. घोड्याची नाल- घोड्याच्या नालवर लिंबू मिरची लावून घराच्या दाराच्या मध्यभागी लटकवा. असं केल्यानं घराला कोणाची नजर लागत नाही, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.
2. विंड चाइम- घरात विंड चाइम लावल्यानं सकारात्मक ऊर्जा राहते. त्याचा थेट परिणाम आपल्या नशिबावर होतो. विंड चाइममुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि देवी लक्ष्मी वास करते.
3.चिनी नाणी- फेंगशुईमध्ये चिनी नाणी अतिशय शुभ मानली जातात. असे मानले जाते की घरात लाल फितीमध्ये अशी तीन नाणी बांधून ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. तीन नाणी त्रिभुवनाचे प्रतीक मानली जातात. हे तीन देवींचे प्रतीक मानली जातात
4. लाफिंग बुद्धा – पैशांची थैली धरून ठेवलेला लाफिंग बुद्धा घरात ठेवणं खूप शुभ मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्धाची मूर्ती अडीच इंचांपेक्षा मोठी नसावी. लाफिंग बुद्धाला आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं.
टीप : वर दिलेली माहिती वास्तुशास्त्रातील प्रचलित मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे.