(संगमेश्वर)
कोकण रेल्वे महामार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक संगमेश्वर रोड आहे. या स्थानकातून हजारो प्रवासी ये-जा करतात. तर संगमेश्वर रेल्वे स्टेशनमधून कोकण रेल्वेला या वर्षी 4 करोड 93 लाख कोटीच्या घरात उत्पन्न मिळाले आहे.
संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वरील पाणपोईंना नळ असून त्याला पाणीच नाही. यासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही जाग आलेली नाही. आता कडक उन्हाळा सुरू झाला असून परतीच्या प्रवाशी वर्गाला उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. हि बाब स्टेशन मास्तरांच्या लक्षात आणून देण्यात आली. तरी त्यावर कोणतीच उपाययोजना केली जात नाही. अशा अवस्थेत स्टेशनवर प्रवाशांचे पाण्याविना हाल होत आहेत. तरी कोकण रेल्वेचे अधिकारी याची दखल घेणार आहेत का? की नेहमीप्रमाणेच संगमेश्वर रेल्वे प्रवाश्यांना वार्यावर सोडणार?, असा सवाल आता पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केला आहे.