( रत्नागिरी )
रत्नागिरी पावस रस्त्यावर वायंगणी फाटा येथे साळवी गार्डनकडे वळणाऱ्या दुचाकीला मागुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. नारायण वासूदेव चिपळूणकर (वय ६८, रा. मांडवकरवाडी, कोळंबे, रत्नागिरी) व सिद्धेश दीपक गुरव (वय २४, रा. दाभिळ आंबेरे ता. रत्नागिरी) जखमी आहे. सदर घटना गुरुवारी (ता. २१) दुपारी साडेबाराच्या सुमारास वायंगणी फाटा येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद दीपक मुरकर (वय २३, रा. मागलाड-रत्नागिरी) दुचाकी (एमएच ०८ एएच ५१२२) वरुन नारायण वासुदेव चिपळणकर यांना सोबत मागे बसवून रत्नागिरी ते पावस रस्त्यावरुन वायंगणी फाटा येथील साळवी गार्डन येथे इंडिकेटर देऊन वळत असताना मागून भरधाव वेगाने येणारी दुचाकी (एमएच- ०६ एडब्ल्यू ०७०३) वरील स्वार सिद्धेश गुरव याने जोरदार धडक दिली.