(रत्नागिरी)
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्थेने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत या. भा. शिर्के प्रशालेचे उपमुख्याध्यापक रमेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था, इन्फिगो आय केअर सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रा. भा. शिर्के प्रशालेत कान, नाक, घसा व डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते. यावेळी उपमुख्याध्यापक रमेश चव्हाण बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन स्कूल कमिटीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सई धुरी, दंत चिकित्सक डॉ. श्रुती पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध खामकर, शैलेश मुकादम, अरुण आडिवरेकर, दिव्यांशी रसाळ, अंजली सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख श्रीनिवास जोशी, प्रथमेश भागवत, संध्या बेटकर, इन्फिगोचे साहिल पीरखान, गणेश कांबळे, हिना चौधरी, तुषार केळकर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिरात बारावीच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी मुख्याध्यापक गायत्री गुळवणी, संस्थेचे पदाधिकारी बिपीन शिंदे, अनुराधा लेले, सारिका विलणकर, अभिजीत विलणकर, विद्यार्थी अमेय सावंत, यश डोंगरे, आदित्य नार्वेकर, सोनम माळी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.