(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे इयत्ता बारावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. यावेळी उद्योगपती महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष भैयाशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त छापलेल्या दहावी व बारावीनंतर काय ? या मार्गदर्शनपर पुस्तिका विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलताना क्रीडाशिक्षक राजेश जाधव म्हणाले, सौ. ऋतुजा जाधव (मा.सभापती समाज कल्याण समिती व जिल्हा नियोजन समिती सदस्य) यांनी आपल्या वाटद जिल्हा परिषद गटातील तरुण-तरुणींना भविष्यात कोणत्या क्षेत्रात शिक्षणासाठी जावे व आपले भविष्य उज्वल करावे यासाठी ही मार्गदर्शनपर पुस्तिका छापलेली आहे. त्यामुळे ही पुस्तिका विद्यार्थ्यांना मार्गदर्शक, दिशादर्शक ठरणार आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना राजेश जाधव यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सर्व माहिती एकत्रित संकलित मिळाल्याने प्राचार्य पोतदार, डी.डी., संस्थेचे सहसचिव प्राचार्य लंबे एस.एस., कोषाध्यक्ष संदीप सुर्वे सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त करून माजी समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव मॅडम यांचे आभार मानले.