(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकत्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटद कोंडवाडी या शाळेच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेत वाटद केंद्रातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद (चॅम्पियन ट्रॉफी) पटकावत यशाला गवसणी घातली.
विद्यार्थ्यांच्या क्रीडाविषयक सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी हिवाळी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. शैक्षणिक वर्षे २०२३ – २४ यावर्षीच्या रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या हिवाळी केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डी मुलगे – मुली, खो खो मुलगे – मुली आणि लंगडी या पाचही सामूहिक क्रीडा प्रकारात आपले सर्वस्व झोकून देत प्रथम विजेता क्रमांक पटकावला. तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे मुलगे – प्रथम तेजस विनोद धनावडे, थाळीफेक मुलगे – द्वितीय श्रेयस दिपक कुर्टे, उंच उडी मुलगे द्वितीय – तेजस विनोद धनावडे, लांब उडी मुलगे तृतीय पियुष परेश धनावडे, गोळाफेक मुलगे तृतीय तेजस विनोद धनावडे, थाळीफेक मुली – द्वितीय स्वरा रवींद्र धनावडे, लांब उडी मुली – द्वितीय मनस्वी महेंद्र धनावडे, उंच उडी मुली – द्वितीय गौरी आज्ञेश तांबटकर, उंच उडी मुली तृतीय अबोली शंकर धनावडे यांनी क्रमांक पटकावत यश संपादन करून शाळेच्या यशाची पताका सर्वदूर पोहचवली. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर मिळविलेल्या सर्व विजयामुळे सलग दुसऱ्या वर्षी वाटद केंद्राचे सर्वसाधारण विजेतेपद ( चॅम्पियन ट्रॉफी) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेला मिळाले आहे.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माधव विश्वनाथ अंकलगे, उपशिक्षिका सौ. रेणुका प्रभाकर धोपट यांनी शाळेचे बालरक्षक श्री. विश्वनाथ विठ्ठल शिर्के, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. स्वाती महेंद्र धनावडे, उपाध्यक्ष श्री. मारुती शंकर कुर्टे, माता – पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. मनस्वी मंगेश तांबटकर, सौ. अनिल लक्ष्मण रेवाळे यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माता पालक संघाचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सर्व सदस्य आणि वाटद कवठेवाडी, वाटद तांबटकरवाडी, वाटद धोपटवाडी मधील सर्व पालक आणि सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात सराव घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या दिवशी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या यशाबद्दल पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, वाटद केंद्राचे केंद्रप्रमुख एकनाथ महाकाळ, वाटद ग्रामपंचायतचे सरपंच अमित वाडकर, उपसरपंच सुप्रिया नलावडे, ग्राम विकास अधिकारी रमेश डडमल, माजी सरपंच तथा शाळा विकास समितीचे अध्यक्ष अप्पा धनावडे, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, शिक्षणतज्ञ विलास बारगुडे, शाळा विकास समितीचे उपाध्यक्ष रमेश तांबटकर, उपाध्यक्ष महेश घवाळी, सचिव प्रभाकर धोपट, खजिनदार सुवर्णा धनावडे, सहखजिनदार वैशाली कुर्टे, सहसचिव गौरव धनावडे यांच्यासह शाळा विकास समितीचे सर्व सदस्य, पालक आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून मिळविलेल्या यशाबद्दल सर्वच स्तरांतून कौतुक करतांनाच अभिनंदन करण्यात येत आहे.