( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वाटद कवठेवाडी येथील चव्हाटेश्वर मित्र मंडळ आणि कवठेवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष ऍड. ऋषिकेश कोळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उपस्थित असणारे जयगड पोलीस स्थानकाचे विनय मनवल यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी यांची आवश्यकता असते. तसेच खेळभावना अत्यंत आवश्यक असते असे मार्गदर्शन केले.
या स्पर्धेला जयगड, खंडाळा, जाकादेवी आणि मालगुंड परिसरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा अंतिम सामना एकता क्रिकेट संघ आणि साईबाबा क्रिकेट संघ कचरे यांच्यात झाला. त्यामध्ये एकता कासारी संघाने बाजी मारत विजेतेपद पटकावले तर साईबाबा कचरे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ट्रॉफी आणि आर्थिक सहकार्य रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव, सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी उद्योजक रुमेश धनावडे, क्रीडा शिक्षक राजेश जाधव, भारतीय युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश कोळवणकर, शिवसेनेचे वाटद ग्रामपंचायतचे तरुण आणि अभ्यासू ग्रामपंचायत सदस्य अमित वाडकर, उद्योजक विष्णू चव्हाण, व्यावसायिक हैदर अली, सामाजिक कार्यकर्ते सलीम मोटलानी यांनी सहकार्य केले.
तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे विभाग संघटक अप्पा धनावडे, नारायण धनावडे, विजया धनावडे, विलास किंजळे, पंकेश धनावडे, गणपत धनावडे, राजेंद्र धनावडे, बाळू धनावडे यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना चेतन धनावडे, विश्वनाथ शिर्के, परेश धनावडे, गौरव धनावडे, प्रशांत धनावडे, प्रल्हाद धनावडे, संदीप धनावडे, प्रदीप धनावडे, निलेश धनावडे, सागर धनावडे यांनी विशेष प्रयत्न केले.