(नवी दिल्ली)
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिल्लीत हृदयविकाराचा झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेलेले असताना त्यांना हा झटका आला. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने हर्षवर्धन जाधव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांना रुग्णालयात नेतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव स्वत:च प्रकृतीबद्दल सांगताना दिसत आहेत. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
…वाचलो तर पुन्हा भेटू; हर्षवर्धन जाधव यांचा Video आला समोर pic.twitter.com/ONJRxeHyVf
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 24, 2023
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याअगोदर हर्षवर्धन यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मला बहुतेक अटॅक आला आहे. माझी एन्जिओप्लास्टी झाली आहे. माझं डोकं दुखतंय, छातीत कळ येतेय, खूप घाम येतोय. मला सरकारच्या गाडीने घेऊन चालले आहेत. भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या, कन्नड विधानसभा मतदारसंघाची काळजी घ्या, चांगलं वागा, चांगल्या लोकांशी बोला, परोपकारी भावनेने जगा. वाचलो तर पुन्हा भेटू असं हर्षवर्धन या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.
हर्षवर्धन जाधव काही कामानिमित्त काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्यांना तत्काळ दिल्ली येथील आर एम एल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. हर्षवर्धन जाधव यांना रुग्णालयात नेत असताना ते एका व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत की, भारत माता की जय, देशाची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या, कन्नड सोयगाव मतदार संघाची काळजी घ्या, चांगलं वागा, चांगल्या लोकांशी बोला परोपकारी भावनेने जगा, वाचलो तर पुन्हा भेटू.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जाधव म्हणाले की, मला बहुतेक अटॅक आलेला आहे, माझं एनजीओ प्लास्टि झालं आहे, मी गडकरी साहेबांच्या घरी होतो, मला आता हॉस्पिटलला घेऊन चालले आहेत, मी दिल्लीला आहे, माझं डोकं खूप दुखतयं, छातीत कळा मारत आहे, घाम आला आहे, मला शासनाच्या गाडीने रुग्णालयात घेऊन जात आहेत, असं हर्षवर्धन जाधव स्वत: व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.