( लांजा )
तालुक्यातील वाकेड ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप सावंत यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा बहुमान नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली गावातील विद्यार्थिनी वैभवी गुरव हिला दिला. गावाचे ध्वजारोहण या गुणवंत विद्यार्थिनीच्या हस्ते करुन वाकेड गावचे सरपंच संदीप सावंत यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे.
अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या सांगता सोहोळ्यानिमित्ताने तालुक्यातील वाकेड ग्रामपंचायतीच्यावतीने विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहणाचा मान गावातील सरपंच संदीप सावंत यांनी गावातील एकूण ९ वर्षीय विद्यार्थिनी वैभवी विजय गुरव हिला दिला. तिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच संदीप सावंत यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्ताने विविधांगी कार्यक्रम आयोजित केले होते. यावेळी विविध क्षेत्रात सहभागी होऊन नावलौकिक मिळालेल्या गावातील गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला. गावातील विधवा महिलांचा सुद्धा यावेळी मानसन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून गावचे गावकर राघो भितळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मौसमी शेट्ये होत्या.
फोटो : वाकेड ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण करताना नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली गावातील विद्यार्थिनी वैभवी विजय गुरव, सोबत सरपंच संदीप सावंत आदी मान्यवर