(रत्नागिरी / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील वांद्री कुणबीवाडी येथे विठ्ठल रखुमाई समाज मंदिरामध्ये अनिष्ठ विधवा प्रथा कायमस्वरुपी बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला.
यावेळी सरपंच दीपक किंजळे, यशदाच्या ट्रेनर व मार्गदर्शक वैदेही सावंत, गावकर गजानन सालीम, दत्ताराम सालीम, अनंत खापरे, सुरेश सनगरे, लक्ष्मण शिगवण, लक्ष्मण पाताडे, सुनील सालीम, मनस्वी चंदरकर, ग्रामपंचायत सदस्य, सुभाष धों. सालीम, विश्वनाथ मांजरेकर, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुभाष कृष्णा सालीम, सेक्रेटरी संदीप मांजरेकर, प्रदीप सनगरे, पोलीस पाटील सुनील शिगवण, तलाठी अशोक जाधव यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पतीच्या निधनानंतर कोणतेही अलंकार न उतरवणे, सद्यस्थितीत असणाऱ्या विधवा महिलांना यापुढे परिपूर्णा या नावाने संबोधणे, सार्वजनिक किंवा व्यक्तिगत कार्यक्रमात दुजाभाव न करता हळदीकुंकू करता बोलावणे, देवकार्यात समान सहभाग देणे याबाबतची प्रतिज्ञा वैदेही सावंत यांनी दिली. सर्व विधवांना सन्मानपूर्वक हळदीकुंकू लावण्यात आले. यापुढे परिपूर्णा महिला कुंकू व अलंकार घालून सन्मानाने समाजात वावरू वावरतील असे ठरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज सालीम यांनी केले.