(नवी दिल्ली)
मास्टरकार्डचे माजी सीईओ आणि भारतीय वंशाचे अजय बंगा वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अजय बंगा यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.
६३ वर्षीय अजय बंगा हे जनरल अटलांटिकमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि सीईओ राहिलेले आहेत. भारतीय वंशाचे अजय बंगा यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी असून वैश्विक कंपन्यांच्या निर्मितीत आणि व्यवस्थापनात त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे.
जो बायडन म्हणाले की, अजय बंगा यांच्याकडे लोक आणि प्रणाली व्यवस्थापित करण्याचा आणि योग्य परिणाम देण्याचा अनुभव आहे आणि हा अनुभव त्यांच्या जगभरातील नेतृत्वासोबत कार्य करु मिळाला आहे.’ या वर्ल्ड बॅंकेत एकूण १८९ देशांचा सहभाग आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे. रोजगार निर्माण करणाऱ्या आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जगभरातील नेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे. त्यासोबत भागीदारी करण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे.
अजय बंगा यांचा महाराष्ट्राशी जवळचा संबंध आहे, कारण त्यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे एका शिख कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय सेनेत निवृत्त लेफ्टनंट जनरल होते. अजय बंगा यांचं कुटुंब मूळचं पंजाबच्या जालंधरचं असून दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर आयआयएम अहमदाबाद येथे त्यांनी एमबीए पूर्ण केलं. अजय बंगा यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. असे अजय बंगा आता वर्ल्ड बॅंकेच्या अध्यक्षपदी विराजमान होत आहेत ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
अजय बंगा यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1959 रोजी पुण्यातील खडकी छावनी येथे एका शिख कुटुंबात झाला होता. त्यांचं कुटुंब मूळचे पंजाबमदील जालंधर येथील राहणारे आहे. त्यांचे वडील हरभजन सिंह बंगा एक निवृत्त लेफ्टिनेंट जनरल आहेत. त्यांना 2016 मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेय.