(दापोली)
वराडकर बेलोसे महाविद्यालय दापोली येथे आज दि. १४ जानेवारी रोजी डॉ. सी. डी. देशपांडे महाविद्यालय दापोली येथे यांचा जन्मदिन हा भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. आर. कोळी, अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सिताफुले, ग्रंथपाल प्रा. तेजस रेवाळे, भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार गारडे उपस्थित होते. भूगोलाच्या प्राध्यापिका स्कंधा खेडेकर यांनी प्रास्ताविकात १४ जानेवारी व भूगोलाचे महत्व विशद केले.
प्रास्ताविकात प्रा. खेडेकर यांनी भूगोल दिनाचे महत्व सांगताना म्हटले की भूगोल दिन या सोबत १४ व १५ जानेवारीला येणाऱ्या मकर संक्रातीच्या सुर्व धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. यात सूर्याच्या उर्जेचे संक्रमण होते. त्यामुळे ऋतूमध्ये बदल होण्याचा व दिवस असतो. त्यामुळे या दिवशी भूगोल विभागातर्फे विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.
भौगोलिक प्रदर्शन, भित्तीपत्रकाचे प्रकाशन, ई. प्रकाशन केले जाते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. आर. कोळी यांनी भित्तीपत्रकाचे व Geography Handbook and Wallpaper Publication चे प्रकाशन केले. भूगोल दिनाच्या निमित्ताने भूगोल विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि महत्व समजावे यासाठी या दिनाचे खूप महत्व आहे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर डॉ. सिताफुले, डॉ. गारडे, ग्रंथपाल श्री. तेजस रेवाळे, प्रा. स्कंध खेडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी भूगोल विभाग प्रमुख प्रा. गारडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. सर्व उपस्थितांचे आभार श्री. श्रीकांत पवार यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.