(दापोली)
आर.व्ही.बेलोसे एज्युकेशन फाऊंडेशन दापोली संचालित न.का.वराडकर कला आणि रा. वि.बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात शिशिर महोत्सवाअंतर्गत वार्षिक क्रिडा स्पर्धांचे आयोजन दि. २० व २१ डिसेंबर या दरम्यान क्रिडाविभागामार्फत करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक २० डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता संस्थेच्या सभापती श्रीमती जानकीताई बेलोसे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे सचिव श्री.डॉ.दशरथ भोसले यांच्या प्रमुख उपस्थिती स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त मा.मीना कुमार रेडीज, श्रीमती सुनिता बेलोसे, प्राचार्य डॉ.भारत कऱ्हाड, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.सिद्राया शिंदे व प्रा.लक्ष्मीकांत पाटील, क्रिडाविभागप्रमुख प्रा. सुरेश खरात, प्रा. राजेंद्र देवकाते व प्रा.पूनम सावंत उपस्थित होते. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी कबड्डी, क्रिकेट, हॉलिबॉल, रनिंग, भालाफेक, गोळाफेक इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन केले होते. यावेळी प्रा.डी.आर. कोळी, डॉ.सुरेश निंबाळकर, प्रा.उत्तम पाटील, प्रा.विश्वंभर कमळकर यांनी क्रिडामहोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे आयोजन यशस्वी होण्यासाठी प्राचार्य, क्रिडाविभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी व सहभागी सर्व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.