(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गावातील सुभद्रा सुदाम शिरगावकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वरवडे येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा सुदाम शिरगावकर या श्री. राधाकृष्ण महिला मंडळाच्या ज्येष्ठ व सेवाभावी कार्यकर्त्या होत्या. गावातील सर्वांच्या सुख दुःखाच्या प्रसंगी त्या आत्मियतेने हजर असत.
पूर्वीच्या काळात गावात होणाऱ्या नाटकांची रिहर्सल तसेच डायरेक्टर, नाटकातील कलाकारांचे चहापान, जेवण आपुलकीने करत. वाडीतील हौशी मुलांनी १९९२ साली बेंजो घेतला, त्यावेळी वाडीत मंदिर वगैरे काहीच नव्हते, बेंजोचा सराव व वाडीतील मुलांची जेवणा- झोपण्यापासूनची सोय त्या करत. वाडीतील मुलांना जाकडी नृत्यासाठी त्या प्रोत्साहित करत असत. स्वभावाने त्या खूपच प्रेमळ होत्या. त्यांचे दहावे व बाराव्याचे विधी दि.१२ जुलै रोजी वरवडे खारवीवाडा येथे होणार आहे.