(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच प्रकाश विठ्ठल कदम यांच्या पत्नी साक्षी प्रकाश कदम यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे 37 वर्षांचे होते. निवेंडी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर कार्यरत असलेल्या प्रकाश कदम यांच्या पत्नी साक्षी कदम या अतिशय प्रेमळ मनमिळावू व सुस्वभावी होत्या. त्या वरची निवेंडी शांतीनगर येथील भारतीय बौद्ध महासभा गाव शाखेच्या महिला मंडळाच्या सचिव पदावर गेली काही वर्षे कार्यरत होत्या.
त्यांचा सामाजिक व धार्मिक कामकाजातील सहभाग हा आजारपणात असताना देखील सर्वांना कौतुकास्पद ठरत असे.त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना आदर्शवत वाटत असतानाच एका अल्पशा आजाराने त्यांचे आकस्मिक दुःखद निधन झाल्याने संपूर्ण भारतीय बौद्ध महासभेच्या महिला मंडळावर मोठी शोककळा पसरली आहे.तसेच संपूर्ण निवेंडी गावातून त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या अंत्ययात्रेला निवेंडी ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश उर्फ बंड्या गोवळकर यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक , महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्षी कदम यांचा जलदान तथा शोकसभेचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भारतीय बौद्धमहासभा गावशाखा निवेंडी शांतीनगर यांनी व कदम कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.