( चिपळूण )
वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतपिकांची नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या दृष्टीने कार्यपद्धती ठरविणे आणि नुकसान टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना सुचविण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना सुचविताना नुकसान भरपाई वाढविण्याबरोबर वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली.
समितीच्या पहिल्याच बैठकीत कोल्हापूर येथील मुख्य वनसंरक्षक आर. एस रामानुजन यांच्या समन्वयाखाली अभ्यासगट नियुक्त करून त्यांच्याकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात क्षत्रीय दौरा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सिंधुदुर्गनंतर या अभ्यास गटाने जिल्ह्यात क्षेत्रीय दौरा केला. सावर्डे येथे मुख्य वनसंरक्षक रामानुजन, कृषी सहसंचालक बिराजदार, योगेश परुळेकर, डॉ. विनायक पाटील, प्रा. प्रकाश क्षीरसागर यांच्या अभ्यास गटासमोर आमदार शेखर निकम आणि शेतकऱ्यांनी उपाययोजना सुचवल्या.