(पाचल /तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील कळसवली गावातील रामचंद्र राजाराम शेवडे यांच्या शेवडेवाडी येथील विहिरीत गवा हा वन्यप्राणी पडल्याची माहिती श्री शांताराम जनार्दन शेडेकर यानी काल 8 जून रोजी कळसवली गावचे अमित कृष्णा बाने यांना दिली. त्यांनी सदरची घटना सायंकाळी ५:४५ वाजता परिमंडळ वनधिकारी राजापुर सदानंद घाटगे यांना सांगितली. त्यानुसार सदर घटनेबाबत माहिती परिक्षेत्र वनधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार यांना भ्रमणध्वनी वरून सांगितली.
वनपाल राजापुर यानी स्थानिक रेस्कुटीमच्या सहाय्याने जागेवर सायं 6.45 वाजता पाहणी केली असता, सदरची विहीर ही 20 फूट खोल असुन त्यामध्ये पाण्याची खोली 6 ते 7 फुट आहे घेरी 20 ते 22 फूट असून विहरीला कठडा नाही. सदरची विहीर नाल्यालगत असल्याने विहिरीतील पाण्याचा शेतीसाठी वापर केला जातो.
सदरच्या विहिरीत पडलेल्या गवा नर असून त्याचे वय साधारण दिड ते दोन वर्षे आहे, विहिरीची खोली जास्त असल्याने JCB च्या साहाय्याने रॅम्प करणे आवश्यक होते. त्याप्रमाणे सायंकाळी 7.30 वाजता JCB सहाय्याने रस्ता तयार करण्यात आला व नैसर्गिक रीत्या गवा सुस्थितीत रात्री 7.45 वाजता बाहेर काढण्यात आला.
विहिरीत पडलेल्या वन्यप्राण्यांस कोणतीही इजा अथवा जखम झाली नसल्याचे वनविभागाकडून कळविण्यात आले आहे. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वन्यप्राणी नैसर्गिक अधिवासात सुस्थितीत निघून गेल्याचेही सांगण्यात आले आहे.
याबाबतच्या कार्यवाहीसाठी विभागीय वनाधिकारी रत्नागिरी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी , सदानंद घाटगे वनपाल राजापूर, विक्रम कुंभार, वनरक्षक, हरिश्चंद्र गुरव वनमजुर, गणेश गुरव, विजय म्हादे, दिपक म्हादे, नितीन बाने, सरपंच कळसवली श्री देवेश तळेकर यांनी रेस्कुसाठी सहकार्य केले.
वन्यप्राणी अडचणीमध्ये आढळून आलेस वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी वनविभागाच्या वतीने प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केले आहे.