वजन कमी करण्यासाठी आहार कमी करण्याची गरज नाही. वजन वाढण्याच्या समस्येवर उपाय काय? असं विचारलं असता लोक डाएट कमी करण्याचा सल्ला देतात. काही आहारतज्ज्ञ तर सांगतात की, डाएट कमी करण्याची आवश्यकता नाही. पण संतुलित आहार घ्या. मात्र नेहमी खाण्याच्या पदार्थांचा जर इतर काही पदार्थांशी संयोग केला तर वजन कमी होण्यास मदत होते. पाहूया वजन कमी करण्याचे असे 10 सोपे उपाय…
- एक सफरचंद आणि अर्धा कप अक्रोड यांचे सॅलड बनवा आणि ते दररोज खा. सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, तर अक्रोडात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. वजन कमी करण्यासाठी हा संयोग म्हणजे बिनतोड मानला जातो.
- एक वाटी दह्यात 4 स्ट्रॉबेरीज् टाका, अन् हे मिश्रण खा. स्ट्रॉबेरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. वजन कमी करण्यासाठी ते मदत करतात.
- उकडलेल्या अंड्यावर काळी मिरी पावडर टाकून खा. अंड्यामधील प्रोटिन्स आणि काळ्या मिरीत असलेले क-जीवनसत्त्व यांच्या संयोगाने वजन कमी होते.
- केळी आणि पालक यांना एकत्र करून खाल्ल्यास शरीरात जमलेले फॅट्स चांगल्यापैकी बर्न होतात.
- एक वाटी दह्यात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा आणि हे मिश्रण खा. शरीरातील फॅट्स बर्न करण्यात हे कॉम्बिनेशन उपयुक्त ठरते.
- अशीच चिमूटभर दालचिनी पावडर कॉफीमध्ये टाकून प्यायल्यास वजन बर्यापैकी कमी होते. दालचिनीत असलेले अॅन्टी ऑक्सिडंट्स शरीरातील इन्सुलीनचे प्रमाण नियंत्रित ठेवते. त्यामुळे वजन कमी होते.
- काही लोकांना सफरचंद खाण्याचा कंटाळा येतो. अशा लोकांनी सफरचंदाचे तुकडे करावेत. अन् हे तुकडे वितळवलेल्या चॉकलेटमध्ये घालून खावेत. चव चांगली लागेल आणि वजनही कमी होईल.
- फरसबी आपले वजन कमी करण्यास मदतगार ठरते. ह्या फरसबीचे तुकडे करून, त्यामध्ये मक्याच्या कणसाचे दाणे मिसळा. अन् हे कॉम्बिनेशन खा. फरसबीचे गुण आणि मक्याच्या दाण्यामध्ये असलेल्या कर्बोदिकांचे मिश्रण झाले की, वजन चांगलेच कमी होईल.
- दुधाचा चहा पिण्यापेक्षा बिनदुधाचा चहा प्या. त्यातही ग्रीन-टी सर्वोत्तम. या ग्रीन टी मध्ये लिंबू पिळून प्या. हा वजन कमी करण्याचा अगदी साधा, सोपा उपाय आहे.
- आपण रोजच्या भाज्यांमध्ये हळद टाकतोच. तिच्या सोबत काळी मिरी पावडर टाका. या मिश्रणाने वजन कमी होण्यास मदत होईल.
लवकर निजे लवकर उठे
वजन वाढू न देण्यासाठी वेळच्या वेळी झोपून सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. रात्री साधारणपणे दहा वाजता झोपून पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान उठल्यास तुमची झोप पूर्ण होईल, त्यासोबतच तुम्ही वजनवाढीच्या समस्यांपासून दूर राहाल. पहाटे लवकर उठल्यानंतर सर्वप्रथम शरीर डिटॉक्सिफाय करायला विसरू नका.
लिंबाचा रस प्या
शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी सकाळी उठल्यावर किंवा फ्रेश झाल्यानंतर लगेच कोमट पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून त्याचं सेवन करा. पाण्यामध्ये दालचिनीचा छोटा तुकडा, एक चमचा ओवा किंवा एक चमचा हळद घालून ते पाणीसुद्धा पिऊ शकता. असं केल्यानं तुमच्या शरीरातील अनावश्यक द्रव्य बाहेर पडून चरबी कमी होण्यास मदत होईल. तसेच वजन वाढू न देण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम उपाय आहे.
भरपूर पाणी, साखरेऐवजी गुळाचे सेवन करा
पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्यामुळे रोज साधारणपणे आठ ते दहा ग्लास पाणी प्यावं. साखर आरोग्यास हानिकारक असल्यामुळे शक्य होईल तिकडे साखरेऐवजी गुळाचा वापर करा. आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करावा. डाळी, चणे, राजमा, पनीर हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत. आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त असल्यास पाण्याचं सेवनसुद्धा अधिक प्रमाणात करावं. वजन कमी करण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा.
कांदा
कांद्यामध्ये आढळणारे सॉल्यूबल फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एक कप कांद्यामध्ये 64 कॅलरीज, 15 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 16 ग्रॅम फॅट, 7 ग्रॅम फायबर, 76 ग्रॅम साखर आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे कंपाउंड असते. या फ्लेव्होनॉइडमध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात कांद्याचा समावेश करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्याचा रस नियमितपणे पिणे. कांदा भाजीमध्ये तळल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. कांदे पाण्यात उकळून रस तयार करता येतो. कांद्याचे सूप लंच किंवा डिनरमध्ये पिऊ शकता. चवीला उत्कृष्ट असलेले हे सूप वजन कमी करण्यासही मदत करते. तुम्ही कांद्याच्या सूपमध्ये प्रोटीनसाठी पनीर देखील वापरू शकता. याशिवाय कच्च्या कांद्याचाही आहारात समावेश करू शकता.