( रत्नागिरी /प्रतिनिधी )
तळागळातील शोषित ,पिडीत शेतकरी, शेतमजुर कष्टकरी ऊसतोड व संविधानिक हक्क अधीकारापासुन कोसो दूर असलेल्या वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर अहोरात्र कार्य करत आहेत. “बहुजन सारे एक होऊ, सत्तेची किल्ली हाती घेऊ” असा नारा देत सत्तेची किल्ली बहुजन समाजाच्या हाती यावी, यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. कोकणात ही वंचित बहुजन आघाडी सक्रिय होताना दिसत आहे. खेड तालुक्याचे अध्यक्ष डि.जी. गमरे व खेड तालुका पदाधिकारी यांच्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे (गुरुवार दिनांक २२ सप्टेंबर २०२२ रोजी ) आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी संतोष खोपकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर रत्नागिरी (उत्तर) जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव आणि जिल्हा महासचिव सुदर्शन सकपाळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सदर मेळावा खेड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन याठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे. यासोबत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी जिल्हयातील तरूण युवक-युवती व फुले, शाहु, आंबेडकर चळवळीतील काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास हजारोच्या संख्येने उपस्थीत राहुन वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्याचे साक्षीदार व्हावे असे जाहीर आवाहन वंचित बहुजन आघाडीचे खेड तालुका महासचिव गणपत पड्याळ व तालुका पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.