[ निवोशी/गुहागर : उदय दणदणे ]
कोकणची बहुप्रिय लोककला “जाखडी नृत्य” अर्थात शक्ती -तुरा लोककलेचं जतन संवर्धन होण्याबरोबरच लोककलावंत यांना विविध विषयांवर आपली कला सादर करण्याचे कौशल्य विकास व्हावा आणि कोकणची ही लोककला अबाधीत राहून पुढच्या पिढीकडे प्रवाहीत व्हावी हाच बहुउद्देश ठेऊन “वंचित बहुजन आघाडी” वतीने शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ व रविवार दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५ ते रात्रौ १० वाजेपर्यंत ठिकाण- रामपूर गुढे फाटा, राममंदिर पटांगण, गुहागर हायवे रोड ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे गुहागर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, या पाच तालुक्यांच्या जिल्हास्तरीय शक्ती-तुरा (जाखडी नृत्य ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे “वंचित बहुजन आघाडीचे” उत्तर रत्नागिरी अध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सदर स्पर्धेत स्पर्धकांना गण, गवळण व दोन पद सादरीकरण करता येईल.आयोजकांकडे ०७ गुण देण्याचा अधिकार ठेवण्यात आला आहे. या मध्ये काव्य, नृत्य चाली, वाद्य, व गायन स्वर गुण, रंगबाजी, वेळ मर्यादा व संघाकडून भरून घेण्यात येणारे प्रतिज्ञा पत्र त्याचप्रमाणे नृत्य नियम अटी सहित गुण देताना पदाचा आशय समाज प्रबोधन, जनजागृती, अध्यत्मिक, इतिहासीक आधारावर असणे आवश्यक आहे. संतांचे विचार, महापुरुषांचे विचार, शेतकरी, बेरोजगार, जातीय वाद नष्ट करणे, महाराष्ट्राची सद्याची व्यथा, कोकणची महती अशा सर्व विषयांवर पद दोन गाण्यांमध्ये सादर करून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष-मा.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांच्याकडे कलाकार म्हणून आपली अपेक्षा व व्यथा शेवटच्या गीतामध्ये मांडावी.
या करीता प्रथम पारितोषिक- २५००० /-हजार, द्वितीय पारितोषिक- १५०००/-हजार, तृतीय पारितोषिक- १००००/- हजार, सदर स्पर्धा प्रवेश फी विनामूल्य असून सहभागी होणाऱ्या कलापथकाना रोख-२००० हजार व सन्मानचिन्ह त्याचबरोबर प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सतीश जाधव- ९३०७०२८७५४ बुद्धघोष गमरे-९५५२४२७९५८ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.