(संगमेश्वर)
आगामी निवडणुका जवळ येत असल्याने वंचितचे पदाधिकारी गाव, वाडी वस्तीमधील कार्यकर्त्यांसमवेत बैठका घेत आहेत. आगामी निवडणुकीची जोरदार तयारी वंचित आघाडीकडून सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे पक्ष प्रवेश, गाव शाखांचे कार्यक्रम सलग सुरू आहेत. यातच आता तालुका संगमेश्वर महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. प्रिती प्रविण कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षा सौ. करुणा मनोहर जाधव, सचिव सौ.प्रज्ञा रणजित कांबळे, सल्लागार सौ.माधुरी महावीर कांबळे यांची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका संगमेश्वरचे विद्यमान अध्यक्ष राजन जी मोहिते, तालुका उपाध्यक्ष आयुष्यमान दयानंद जाधव, उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे पक्ष प्रवक्ते प्रकाश कांबळे, सरचिटणीस सचिन जाधव, युवा अध्यक्ष संदेश जाधव, कोषाध्यक्ष संतोष जाधव, देवरुख विभाग अध्यक्ष संजय जाधव, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा संगमेश्वर अध्यक्ष राहुल जी मोहिते, माजी जिल्हाध्यक्ष जबा कदम गुरुजी, कोषाध्यक्ष मनोहर मोहिते, महेंद्र जाधव, अनिल जाधव आदी उपस्थित होते.
तसेच यावेळी देवरुख शहर शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष प्रविण काशिराम कदम, सरचिटणीस रणजित सुरेश कांबळे, सचिव शैलेश शरद जाधव, कोषाध्यक्ष वैभव पांडुरंग सकपाळ , उपाध्यक्ष उदय बुध्दजन कांबळे , सल्लागार अशोक बाळ मोहिते, या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पक्ष प्रमुख ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. यामध्ये आरपीआय आठवले गटाचे प्रमुख वाय. जी. पवार, व बि.पी.पवार यांच्यासह त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. सर्व नवनिर्वाचित महिला आघाडी व देवरुख शहर कार्यकारिणी तसेच जाहीर पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.