(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा ५ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता देवरुखातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह याठिकाणी होणार असून या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक गिरीराज पांड्ये उपस्थिती राहणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वूमीवर संगमेश्वर तालुक्यातील वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठी-भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान वंचीत बहूजन आघाडीचा हा मेळावा मोठ्या दणक्यात होण्याची शक्यता आहे. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण जिल्हाध्यक्ष रुपेंदर जाधव , भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राहुलजी मोहिते, उपाध्यक्ष सुभाषभाई जाधव, उपाध्यक्ष विठ्ठलराव जाधव , उपाध्यक्ष श्रीपत मोहिते, पक्ष प्रवक्ते दिपक मोहिते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष राजन मोहिते यांनी केले आहे.