रत्नागिरी : नवरा, नवरी ,करवली हे सुळके लोणावळ्यामध्ये भांबुर्डे या गावात आहेत. गावामधून या सुळक्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्धा पाऊण तासाची पायपीट करावी लागते.रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनीअरिंग या गिर्यारोही संस्थेने नवरा, नवरी, करवली या सुळका समूहावर आरोहण करण्याची मोहीम आखली. या मोहिमेचे नेतृत्व अरविंद नवेले यांनी केले, या मोहिमेमध्ये प्रसाद शिगवण, सतीश पटवर्धन, आकाश नाईक, दिनेश आग्रे, आशिष मोटे, इंद्रजीत खंडागळे हे सहभागी होते. या मोहिमेचे मुख्य आकर्षण होते ८ वर्षाचा सृजन पटवर्धन.
शनिवारी सकाळी 4 वाजता सर्व टीमचे सदस्य भांबुर्डे गावात पोहोचले, 06.30 ला चहा नाश्ताचा कार्यक्रम उरकून लगेचच सुळक्याकडे जाणारी वाट पकडली पाऊण तासात सुळक्यापाशी पोहोचलो. नवरा आणि नवरी सुळक्याच्या खिंडीमध्ये बेस कॅम्प लावला, 9 वाजता नवरा सुळका आरोहणास सुरुवात केली. नवरा सुळका हा कठीण श्रेणीमध्ये येतो. 12 वाजता सर्व सदस्य सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले व दुपारी 2 वाजता सर्व rappelling करून खाली उतरले. लगेचच वेळ वाया न घालवता खिंडीतून नवरा सुळक्याला ट्रॅव्हर्स करून करवली सुळक्याकडे प्रस्थान केले.
करवली सुळका सोप्या श्रेणीमध्ये येतो, दिड तासात सर्व करवली सुळक्याच्या माथ्यावर पोहोचले लगेचच rappelling करून सर्व 6 वाजता नवरा नवरीच्या खिंडीत म्हणजे जिथे बेस कॅम्प लावला तिथे आलो सर्व equipment बॅगेत भरुन बॅग तिथेच झाडाला अडकवून ठेवली आणि सर्व 7 वाजता गावात पोहोचले. रात्री जेवणाची जेवणाची जबाबदारी दिनेश आणि सतीश यांनी सांभाळली.
दुसऱ्या दिवशी रविवारी 5 वाजता सर्व उठले चहा नाश्ता आटपून नवरी सुळका सर करण्यासाठी पुंन्हा ट्रेकला सुरुवात केली, 730 वाजता आरोहणास सुरुवात केली आणि सर्व सदस्यांनी आरोहण करून नवरी सुळक्याचा माथा गाठला.
अशा प्रकारे जिद्दी माउंटेनीअरिंग या संस्थेने भांबुर्डे गावातील नवरा, नवरी, करवली हा सुळक्यांचा समूह ही आरोहण मोहीम निर्विघ्नपणे यशस्वी झाली.