(रत्नागिरी)
५० व्या खेड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या बुधवार दि. ११ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता लोटे येथील कविता विनोद सराफ हायस्कूल येथे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, पंचायत समिती खेड प्रशासक व गटविकास अधिकारी आर एम दिघे, खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीधर शिगवण, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत खेडेकर, जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, लोटे सरपंच चंद्रकांत चाळके, लोटे पर्शुराम असोसिएशन अध्यक्ष राज आंब्रे, रोटरी क्लब अध्यक्ष विजय मोरे, रोटरॅक्ट क्लब अध्यक्ष मकरंद सोलकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता विज्ञान दिंडी, शोभायात्रा, ११. ०० ते १.०० उद्घाटन समारंभ दुपारी २.०० ते ५.०० परीक्षण व प्रदर्शन पाहण्यास खुले राहणार आहे. गुरुवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते १.०० यावेळेत प्रश्नमंजुषा व दुपारी २.०० ते ३.०० या वेळेत नासा अंतराळवीर उदबोधन विषयावर आरती पाटील यांचे व्याख्यान, दुपारी ३.०० ते ४.०० बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यासाठी तहसीलदार प्राजक्ता घोरपडे उपस्थित राहणार आहेत.
विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त विज्ञान
प्रेमी, शिक्षक, विद्यार्थी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अंकुश काते, उपाध्यक्ष बाबुराव घाग, सचिव मोहन वारणकर, शाळा समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, मुख्याध्यापक विजय बसवंत यांनी केले आहे